वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गेल्या नोव्हेंबरमध्ये विमान वाहतुकीमध्ये महिन्याच्या तुलनेमध्ये पाहता बऱयापैकी प्रगती झाली असली तरी वर्षाच्या तुलनेमध्ये प्रवाशांची संख्या निम्मीच राहिली असल्याचे सांगण्यात येत आहे. डायरोक्टरेट जनरल ऑफ सिव्हिल एव्हीएशन यांच्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये 63.54 लाख प्रवाशांनी देशांतर्गत विमान प्रवास केला होता. मागच्या महिन्याच्या तुलनेमध्ये विमान प्रवाशांची संख्या 20 टक्के इतकी वाढली असल्याचे दिसून आले आहे.
सप्टेंबर ते ऑक्टोंबरमध्ये देशांतर्गत विमानांच्या फेऱया 52.71 लाख इतक्मया झाल्या आहेत. मागच्या वर्षाच्या तुलनेमध्ये हवाई वाहतुकीमध्ये 50 टक्के इतकी घट दिसली आहे. जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये 556.84 प्रवाशांनी विमान सेवेचा लाभ घेतला आहे. मागच्या वषी 1311.54 लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. इंडिगो या कंपनीच्या विमानातून नोव्हेंबरमध्ये 34 लाख लोकांनी प्रवास केला होता. स्पाइस जेटमधून 8 लाख प्रवाशांनी त्याचप्रमाणे एअर इंडिया, गो एअर, एअर एशिया इंडिया आणि विस्तारा यांनी अनुक्रमे 6.56, 5.77, 4.21, 3.97 प्रवाशांना प्रवास घडवून आणला. लॉकडाऊनमधील सवलतीनंतर विमान प्रवाशांच्या संख्येमध्ये आणि विमान फेऱयांमध्ये चांगली वाढ झाली आहे.









