आपले सैन्य दल हा आपला अभिमान बिंदू आहे. लष्करी खात्याची कामगिरी नेहमीच वाखाणण्याजोगी असते. आजतागायत आपल्या सैनिक बांधवांनी देशासाठी दिलेले बलिदान आणि देशाच्या हितासाठी कायम केली जाणारी धडपड याचा विचारच आपली मानसिकता बदलवून टाकतो. अशाच काही विचारसरणीवर आधारित आणि सबंध सैनिक बांधवांना समर्पित पहिली मराठी लष्करी घ्क्शन फिल्म आपल्या भेटीस येण्यास सज्ज झाली आहे. लेखक, दिग्दर्शक सचिन आंबात लिखित, दिग्दर्शित स्पेशल चित्रपटाचे पहिले पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले. पोस्टर प्रदर्शनादरम्यान आमदार संजय केळकर (ठाणे शहर) आणि चित्रपटातील कलाकार मंडळी, दिग्दर्शक, निर्माते आणि इतर टीम यांची उपस्थिती होती.

स्वप्न स्वरूप निर्मित आणि शिव ब्रह्मांड सहनिर्मित या चित्रपटाची लेखनाची आणि दिग्दर्शनाची धुरा सचिन आंबात यांनी सांभाळली. लव लफडे चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखनानंतर त्यांचा हा स्पेशल सिनेमा नक्कीच समाजाला स्पेशल संदेश देईल यांत शंकाच नाही. याशिवाय बऱयाचश्या गाजलेल्या गाण्यांची निर्मिती आणि दिग्दर्शनातही सचिन यांनी उत्तम समतोल राखला. त्यांच्या या स्पेशल चित्रपटातून एक स्पेशल जोडी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास येत आहे. ती जोडी म्हणजे अभिनेता सुयोग गोऱहे आणि अभिनेत्री पायल कबरे. शेंटिमेंटल, सातारचा सलमान, सिनियर सिटीझन, आम्ही बेफिकीर यांसारख्या चित्रपटात मुख्य भूमिका साकरल्यानंतर सुयोग स्पेशल या चित्रपटातून एक वेगळ्या धाटणीची भूमिका साकारणार आहे. तर पायल कबरेची या चित्रपटातील भूमिका चित्रपटाच्या नावाप्रमाणेच स्पेशल आहे. पायलने सुप्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांच्या अभिनय शाळेतून अभिनयाचे धडे घेतले आहेत. या चित्रपटातून पायल मराठी चित्रपटसफष्टीत पदार्पण करत आहे आणि म्हणूनच तिच्यासाठी हा चित्रपट नक्कीच स्पेशल असणार आहे. या चित्रपटात सुयोग समर नाईक आणि पायल भूमी राठोड नामक पात्रे साकारणार आहेत. आणि ही दोन्ही पात्रे लष्करी अधिकाऱयाच्या भूमिकेत दिसणार आहेत. चित्रपटाचा मुख्यबिंदू म्हणजे संगीत, आणि याच संगीताची बाजू गायक प्रवीण कोळी – योगिता कोळी आणि गायक अनय नाईक यांनी उचलून धरली. प्रवीण कोळी – योगिता कोळी यांच्या गोव्याच्या किनार्यावर, इष्काची नौका, गोल्डीची हळद या हिट गाण्यानंतर या स्पेशल चित्रपटातील गाणी ही नक्कीच हिट होतील.
एकंदरीत देशाच्या हिताचे एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी समर आणि भूमीची लढाई या संपूर्ण चित्रपटाच्या प्रवासात पाहायला मिळणार आहे. ही लढाई कशी स्पेशल असणार आहे हे स्पेशल या चित्रपटातूनच कळेल.









