प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जय्यत तयारी केली आहे. मंगळवार दि. 22 डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील 117 तालुक्यांमधील 3,019 ग्रा. पं. साठी निवडणूक होणार असून 1 लाख 17 हजार 383 उमेदवारांचे राजकीय भवितव्य मतपेटीबंद होणार आहे. कोरोनाबाधित असणाऱया मतदारांना देखील मतदानाचा हक्क बजावता येणार असून त्यांच्यासाठी सायंकाळी 4 नंतर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.
रविवारी सायंकाळीच पहिल्या टप्प्यातील निवडणुकीच्या जाहीर प्रचाराची सांगता झाली आहे. त्यामुळे सोमवारी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांनी घरोघरी जाऊन प्रचार केला आहे. ही निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर होणार नसली तरी राजकीय पक्षांना पक्षसंघटना तळातून मजबूत करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.
राज्यातील 117 तालुक्यांमधील 3,019 ग्रामपंचायतींच्या 48 हजार 48 जागांसाठी मंगळवारी सकाळी 7 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. त्यापैकी 4,377 जागांवर बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे 43,238 जागांसाठी मतदान होणार आहे. पहिल्या निवडणुकीसाठी एकूण 1 लाख 17 हजार 387 उमेदवार रिंगणात आहेत. तर 432 जागांसाठी उमेदवारी अर्जच दाखल झालेले नाहीत.
5,847ाdन निवडणूक अधिकारी
निवडणूक कामांसाठी 5,847ाdन निवडणूक अधिकारी आणि 6,085 साहाय्यक निवडणूक अधिकाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. एकूण 2 लाख 70 हजार 268 जणांची निवडणूक प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुमारे 45 हजारहून अधिक अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्त्या आणि आरोग्य खात्याच्या कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे.









