कोरोना महामारीच्या काळामध्ये सर्वांच्याच जीवनावर कमी अधिक परिणाम झाल़ा रोजगारावर विपरित परिणाम झाल़ा शिक्षण, अर्थव्यवहारासह प्रत्येक क्षेत्र व्याधी काळामध्ये संकटग्रस्त झाल़े आता कोरोना प्रसाराचा दर झपाटय़ाने कमी होत आह़े त्याचवेळी निर्बंधांचे शिथलीकरण होत आह़े जनजीवन पूर्वपदावर येण्यासाठी शासकीय यंत्रणा एकेक पावले टाकत आहे.
कोकणाच्या दृष्टीने पर्यटन हा एक महत्वाचा उद्योग आह़े सर्वाधिक रोजगार निर्मिती होण्याची शक्यता या व्यवसायात आह़े गेल्या दीड वर्षात पर्यटन उद्योगातील विविध घटक अडचणीत होत़े त्यांनी घेतलेले कर्ज फेडण्याची ऐपत अजिबात शिल्लक राहिली नाह़ी एवढेच काय घेतलेल्या कर्जावरचे व्याज भरणे देखिल अवघड होऊन बसल़े अनेक व्यापारी, उद्योजक व सेवा पुरवठादार यांनी आपापल्या धंद्याला कायमचे टाळे लावण्याचा निर्णय घेतल़ा व्यवसाय चालवण्याची सारी कौशल्ये असताना तसेच बाजारामध्ये वस्तू व सेवांची चांगली मागणी असताना केवळ निर्बंधांमुळे व्यवसाय करु न शकणाऱया पर्यटन उद्यमींनी मनाविरुद्ध जाणारा व्यवसाय बंदीचा निर्णय घेतल़ा
कोकणात काही हॉटेल व्यवसायिक, वाहतूकदार यांच्यासह कित्येकांनी कामातून निवृत्ती स्विकारुन अन्य पर्यायांचा वेध घेतल़ा व्यवसाय बंद पडल्याने त्यासोबत आलेल्या जबाबदाऱया कशाबशा पूर्ण करण्यात आल्य़ा आपत्तीत रुतलेले पर्यटनाचे अर्थचक्र आता पुन्हा एकदा मार्गावर येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आह़े यासाठी निर्बंधांचे सार्वत्रिकीकरण करण्याऐवजी ते किमान स्वरूपात राहतील, याची काळजी घेतली पाहिज़े सत्ता राबवण्याच्या हव्यासातून अतिरिक्त निर्बंध अर्थचक्राला आक्रसवणारे ठरतात़ हे आता सर्वांच्याच लक्षात आले असाव़े
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सागरी जलक्रीडा,
स्कुबा ड्रायव्हिंग, सिंधुदुर्ग किल्ला आदी महत्वाची आकर्षणे पर्यटकांसाठी आहेत़ रत्नागिरी जिल्हय़ात गणपतीपुळे, दापोली येथील समुद्रकिनारे पर्यटकांसाठी आकर्षण केंद्रे आहेत़ परशुराम व पावस येथील देवस्थाने भाविकांसाठी नेहमीच महत्वपूर्ण ठरत आहेत़ निर्बंधांच्या शिथलीकरणानंतर हालचाल वाढली असली तरी अद्याप पर्यटनाने गती घेतली असे म्हणता येणार नाह़ी पर्यटनावर अवलंबून असणाऱया छोटय़ा मोठय़ा घटकांना पर्यटन वाढीची मोठी अपेक्षा लागून राहिली आह़े रत्नागिरी, सिंधुदुर्गासह कोकणातील पर्यटन थबकल्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये देखील मंदी जाणवत आह़े
कोरोना कालावधीतच रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे येथे बोटक्लब सुरू करण्यात आल़ा पर्यटन विकास मंडळाने त्यासाठी आवश्यक सुविधांची उभारणी केल़ी या बोटक्लबमुळे साधन सामुग्री व प्रशिक्षित व्यक्तिंकडून सेवा पर्यटकांसाठी उपलब्ध झाल्या आहेत़ विश्वासार्ह व्यवस्था उभ्या करण्यासाठी शासनाच्या अंगिकृत उपक्रमाने पुढाकार घेतल्याने या क्षेत्रात मोठा रस्ता तयार झाला आह़े अद्याप या बोटक्लबचा उपयोग पर्यटक मोठय़ा प्रमाणात करुन घेत नसले तरी भविष्यात ते मोठे केंद्र ठरेल, अशी अपेक्षा आह़े
सिंधुदुर्ग जिल्हय़ात सागरी पर्यटनाशी संबंधित एखादा प्रकल्प सुरू होणे अपेक्षित आह़े अशी स्थानिक उद्योजकांची मागणी आह़े या जिल्हय़ातील देवबाग, तारकर्ली, वायरी, दांडी, चिवलाबीच येथील उद्योजक हळूहळू आपला व्यवसाय पूर्वस्थितीत यावा म्हणून धडपडत आहेत़ गुहागर, हर्णे, दाभोळ येथील उद्योजकांनी सप्ताहांत पर्यटनासाठी नियमितपणे तयारी ठेवण्याचे ठरवले आह़े
पर्यटन वाढीसाठी धोरण निश्चित करु, विकास आराखडा बनवू असे विविध शब्द सरकारी अधिकारी बोलत असतात़ प्रत्यक्षात असा आराखडा बनवला जाणे त्याचबरोबर यात विविध घटकांचे दायित्व निश्चित करणे असा मुद्दा आजवर झाला नाह़ी रस्ते, इमारती यासारख्या गोष्टीवर खर्च करुन पर्यटन उभारणीसाठी मोठे योगदान दिल़े असे सांगितले जात़े मात्र पर्यटनसाठी उपयुक्त मनुष्यबळ आणि सामाजिक समज निर्माण करण्यासाठी पावले उचलली जात नाहीत ही कोकणी माणसाची व्यथा आह़े पर्यटन धोरण 2016 नुसार 10 वर्षात स्थानिक क्षेत्रात आवश्यक तो विकास व्हावा अपेक्षित आह़े व्यवहारामध्ये 5 वर्षापूर्वी सरकारने काही पर्यटन धोरण स्वीकारल्याची अनुभूती कोकणी माणसांना अजिबात मिळत नाह़ी समुद्रकिनारे खासगी me@ieuee परवानगी मिळणार असे राज्य मंत्री मंडळाने ठरवल़े परंतु अद्याप हे व्यवहारात आलेले नाह़ी एखाद्या कार्यशाळेत लोकांच्या कानांना बरे वाटेल म्हणून विकास विषयक व्याक्ये बोलली जातात़ त्यापैकीच हे वाक्य असावे असा समज निर्माण झाला आह़े खासगी me@ie®es धोरण राज्य सरकारकडून जाहीर होऊन वर्षभर उलटले तरी त्यासाठी कार्य योजना जाहीर झालेली नाह़ी
सरकारी खात्यात परवानगीसाठी अर्ज केल्यानंतर कोणत्याही मुद्याची परवानगी आनंदपूर्वक मिळाली असे होत नाह़ी परवानग्या मिळवणे हा एक कष्टदायक प्रवास असल्याची भावना अर्जदारांमध्ये पसरत़े किमान पर्यटनासारख्या शासकीय प्राधान्य क्षेत्रात विलंबाचे संगीत आळवले जाणार नाही याची जबाबदारी पर्यटन खात्याच्या अधिकाऱयांनी घेतली पाहिज़े me@ie परवानगी असो वा अन्य परवानगी त्यांचा पाठपुरावा करण्याची आणि ते मंजुर करुन घेण्याची जबाबदारी विशिष्ट शासकीय अधिकाऱयावर निश्चित करायला हव़ी
कोकणात पर्यटन वाढीला मोठय़ा प्रमाणात जागा आह़े असे सर्वच पक्षाचे राजकीय नेते म्हणत आहेत़ कोकणातील पर्यटन विकासाकरिता विविध लोकांनी आजवर मोठमोठय़ा घोषणा केल्य़ा तथापि पर्यटनासाठी विशिष्ट टप्पा गाठण्यात आपल्याला यश आलेले नाह़ी पर्यटन वाढीसाठी मनुष्यबळाची उभारणी हा एक मोठा मुद्दा आह़े त्यासाठी पदविकेपासून पदव्युत्तर स्तरापर्यंतचे पर्यटन शिक्षण देणाऱया व्यवस्था कोकणात उभारल्या गेल्या पाहिजेत़ याशिवाय पर्यटनासाठी कौशल्य विकासाचे शिक्षणक्रम देखील योजनापूर्वक सुरू झाले पाहिजेत़ त्याशिवाय पर्यटन विकासाला चांगला मनुष्यबळ आधार मिळणार नाह़ी दीर्घकालीन धोरण निश्चित करुन मनुष्यबळ उभारणीचे आराखडे तयार करणे शक्य आह़े मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आह़े कोरोनाचे संकट हळूहळू मर्यादीत होत असताना पर्यटन क्षेत्राचे थबकलेले चक्र पुन्हा सुरु व्हावे याक†िरता जाणीवपूर्वक प्रयत्नांची निश्चितच आवश्यकता आह़े राज्य कर्त्यांवर दबाव आणण्यासाठी आणि तपशिलाची कार्ययोजना तयार करण्यासाठी या क्षेत्रातील जाणकारांनीच पुढाकारासाठी पाऊल टाकायला हव़े
सुकांत चक्रदेव








