प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहराजवळील असलेल्या मलप्रभा नदीच्या पुलावर एका दुचाकीला कारने धडक दिल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली.
अपघातात जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव महेश कदम (निडगल) असे आहे. महेश कदम हा आपल्या गावाकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी समोरून येणाऱया कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोकीला गंभीर इजा झाल्याने ते दुचाकीवरून खाली कोसळले. त्यांना उपचार तातडीने बेळगाव येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची खानापूर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे.









