प्रतिनिधी/ खानापूर
जांबोटी (ता. खानापूर) येथील एक फोटोग्राफर शुक्रवार दि. 25 रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाला आहे. विजय चंद्रकांत अवलक्की (वय 52) असे त्याचे नाव आहे.
शुक्रवारी सायंकाळी तो आपल्या स्टुडिओमध्ये नेहमीप्रमाणे काम करीत होता. त्यावेळी त्याला काहीनी बोलावून घेऊन गेले होते. पण यानंतर तो घरी किंवा स्टुडिओकडे परतला नाही. त्याचे काही अज्ञातांनी अपहरण केले असल्याची चर्चा जांबोटी परिसरात सुरू आहे. पण अपहरण नेमके कोणत्या कारणासाठी केले आहे, असा प्रश्नही निर्माण झाला आहे. यासंदर्भात खानापूर पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व सहकारी अधिक तपास करीत आहेत.








