वार्ताहर / पालये
वर्ष 2020 ते 2022 या कालावधीसाठी आरएचबी (रिअल हेल्प ब्युरो) च्या पेडणे तालुका गटाध्यक्षपदी कायदा विद्यार्थी, सामाजिक कामगार तथा व्यावसायिक कुणाल किरण ठाकूर (हरमल) यांची निवड झाली.
म्हापसा बोडगेश्वर येथे झालेल्या एका कार्यक्रमात आरएचबी गोवा प्रमुख अमिशा शरत व आरएचबी पेडणेचे माजी अध्यक्ष तथा समाजसेवक सूर्यकांत चोडणकर यांच्या उपस्थितीत अधिकारग्रहण सोहळा झाला. समस्यांचे निराकरण करण्यासाठी आवश्यक कायदा सल्ला पेडणेवासियांना देईन.पेडणे तालुका सुपर डुपर बनविण्यासाठी प्रत्येकाचे सहकार्य व योगदान आवश्यक असल्याचे मनोगत कुणाल ठाकूर यांनी व्यक्त केले.









