जागतिक आरोग्य संघटनेचा सल्ला
कोविड-19 ला पराभूत करण्यासाठी अर्थव्यवस्था पुन्हा खुली करणे हाच सर्वात चांगला मार्ग आहे. कोरोना विषाणूच्या विरोधातील लढाई लढण्यासाठी जीवन आणि उपजीविका यांच्यात अन्य कुठलाच पर्याय नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.
अर्थव्यवस्थांना पुन्हा रुळावर आणण्यासाठी विषाणूला पराभूत करणे, हाच वेगवान मार्ग आहे. चालू आठवडय़ात जी-20 देशांचे नेते भेटणार आहेत. यात त्यांना कोवॅक्सविषयी जागतिक सुविधा प्रदान करण्यासाठी आर्थिक आणि राजकीय स्वरुपात प्रतिबद्ध होण्याची संधी मिळणार असल्याचे उद्गार डब्ल्यूएचओचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयेसस यांनी काढले आहेत.
बहुतांश देशांमध्ये अर्थव्यवस्था खुली
कोविड-19 च्या प्रारंभी टाळेबंदी लागू केल्यावर बहुतांश देशांनी आता आर्थिक चव्रे गतिमान केली आहेत. विशेषकरून भारत, चीन, जपान आणि अमेरिका यासारख्या देशांनी मोठय़ा प्रमाणावर अर्थव्यवस्था पुन्हा खुली केली आहे. सर्वाधिक रुग्ण आढळलेल्या देशांनीच अर्थव्यवस्था पुन्हा खुली केली आहे.









