कोरोना महामारीच्या दुष्टचक्रातून अद्याप अनेक देश बाहेर पडू शकलेले नाहीत. बहुतांश देशांमध्ये दररोज रुग्णांची संख्या वाढत आहे. तर दुसरीकडे फिनलंडने कोरोना संक्रमणावर नियंत्रण मिळविले आहे. फिनलंडमध्ये शारीरिक अंतरातून कोरोनाच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. फिनलंडच्या सरकारच्या प्रारंभिक प्रयत्नांमध्ये कोरोनाचा संक्रमण नियंत्रणात आल्याचे एका अध्ययनात आढळले आहे. फिनलंडच्या 55 लाख लोकांपैकी सुमारे 25 लाख लोकांनी सरकारकडून सादर करण्यात आलेल ऍप डाउनलोड केला होता. या ऍपमध्ये देण्यात आलेली सर्व माहिती लोकांनी स्वेच्छेने अनुसरली आहे. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी शारीरिक अंतराचे पालन करावे लागणार असल्याचे सरकारकडून स्पष्ट निर्देश होते. तेथील नागरिकांनी याचेच पालन करत कोरोनाच्या विरोधात विजय मिळविला आहे. शारीरिक अंतराचे पालन करत फिनलंडमध्ये सार्वजनिक वाहनांमध्ये लोक एक आसन सोडून बसतात आणि सुरक्षित प्रवास करतात. कोरोनाला पराभूत करण्यासाठी त्याच्याबद्दल जागरुक रहावे लागणार असल्याचे तेथील लोकांचे मानणे आहे.
Previous Articleहिवाळय़ात रुग्णांची ओळख पटविणे अवघड
Next Article अर्थव्यवस्था पुन्हा खुली करणे हेच सर्वोत्तम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









