जगातील सर्वात मोठे जीपीएस ड्रॉइंग रेखाटले
गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड्सने एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सर्वांना आश्चर्यचकित करणारा तसेच प्रेरणा देणारा देखील आहे. या व्हिडिओमध्ये व्हिलचेअरवर बसलेली एक व्यक्ती दुबईतील रस्त्यांवरून फिरताना दिसून येते, या व्यक्तीने जगातील सर्वात मोठे जीपीएस ड्रॉइंग तयार केले आहे.
बुर्ज खलिफा परिसर आणि दुबई मॉलमधून प्रवास करत जीपीएसद्वारे त्योन व्हिलचेअरबद्ध लोगोचा आकार साकारला आहे. ‘8.71 किमी (5.41 मैल) अंतराचे सर्वात मोठे जीपीएस ड्रॉइंग साकारणारा सुजीथ वर्गीस’ अशी कॅप्शन गिनिज वर्ल्ड रेकॉर्डने या व्हिडिओला दिली आहे. 2013 मध्ये एका बाइक अपघातात सुजीथला अर्धांगवायू झाला. दृढनिश्चियी असलेल्या सर्व खेळाडूंना प्रेरणा आणि बळ देण्यासाठी त्याने हा विक्रम करण्याचा प्रयत्न केला आहे असेही कॉमेंटमध्ये नमूद करण्यात आले आहे.

प्रत्येकाला समजेल असा आणि भाषांच्या सीमा ओलांडणारा असा लोगो साकारण्याचा अनुभव खूपच सुंदर होता. आम्ही जगभरातील समविचारी लोकांच्या समुदायांना दुबई आणि गिनिज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डद्वारे जगाला संदेश पाठवला आहे. दुबईमध्ये हे सर्व अनुभवणे खूप सुंदर होते, हे शहर प्रत्येक मूल्यांनी आणि महत्त्वाच्या लोकांच्या प्रवेशयोग्यतेने सर्वात समृद्ध आहे असे सुजीथने म्हटले आहे.
हा व्हिडिओ 19 मार्च रोजी पोस्ट करण्यात आला आणि आतापर्यंत 4.6 लाखाहून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओला जवळपास 45 हजारांहून अधिक लाइक्स प्राप्त झाल्या आहेत.









