मुंबई
मंगळवारच्या सत्रामध्ये हरि ओम पाईपचा समभाग 4 टक्के इतका वधारत नव्या उच्चांकी भावावर पोहोचला असल्याचे दिसून आले. गेल्या तीन महिन्यामध्ये हा समभाग शेअरबाजारात 50 टक्के इतका वाढला आहे. मंगळवारी बीएसईवर इंट्रा डे दरम्यान हरि ओम पाईपचा समभाग 4 टक्के वाढत 481 रुपयांवर पोहोचला होता. निधी उभारणीसाठी कंपनीला समभागधारकांनी होकार दिल्याने याचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या भावावरती बाजारात दिसून आला.
आयडीबीआय बँकेचा समभाग वधारला
मुंबई : आयडीबीआय बँकेच्या समभागाने मंगळवारी शेअर बाजारात 52 आठवड्याच्या उच्चांकी भावावर झेप घेण्याचा विक्रम केला. बँकेचा समभाग मंगळवारी शेअर बाजारात साधारण 6 टक्के इतका वाढत 47 रुपयांवर पोहोचला होता. बँकेने 31 डिसेंबर 2022 ला संपलेल्या तिसऱ्या तिमाहीमध्ये 927 कोटी रुपयांचा निव्वळ नफा प्राप्त केला असल्याची माहिती शेअर बाजाराला दिली. दुसरीकडे बँकेचे निव्वळ उत्पन्न याच कालावधीत 2925 कोटी रुपये इतके नोंदले गेले आहे.









