वृत्तसंस्था/ नेनजिंग
कोरोना महामारी समस्येमुळे 2023 सालातील 17 मार्चपासून खेळविली जाणारी विश्व ऍथलेटिक्स इनडोअर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय विश्व ऍथलेटिक्स फेडरेशनच्या नियंत्रण समितीने घेतला आहे.
2020 सालातील विश्व ऍथलेटिक्स इनडोअर ऍथलेटिक्स स्पर्धेच्या यजमानपदासाठी चीनमधील नेनजिंग शहराची निवड सुरुवातीला करण्यात आली होती. दरम्यान, याच कालावधीत कोरोना महामारीला प्रारंभ झाल्याने सदर स्पर्धा 2021 मार्चपर्यंत पहिल्यांदा पुढे ढकलण्यात आली होती. त्यानंतर या समस्येमुळे पुन्हा ही स्पर्धा दुसऱयांदा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नेनजिंग ऍथलेटिक्स आयोजन समिती आणि चीन ऍथलेटिक्स संघटना यांच्यात झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर करण्यात आला. आगामी विश्व ऍथलेटिक्स इनडोअर स्पर्धा ग्लॅसगो येथे 2024 च्या मार्चमध्ये खेळविली जाणार आहे.









