वृत्तसंस्था/ वूर्सेस्टरशायर
2023 च्या इंग्लीड कौंटी क्रिकेट हंगामासाठी वूर्सेस्टरशायर क्रिकेट क्लबने पाकचा फलंदाज अझहर अलीबरोबर नुकताच नवा करार कला आहे. अझहर अलीची या स्पर्धेतील गेल्या हंगामातील कामगिरी दर्जेदार झाल्याने वुर्सेस्टरशायरने अझहर अलीबरोबर पुन्हा करार करण्याचा निर्णय घेतला.
2022 च्या इंग्लीश कौंटी क्रिकेट हंगामात अझहर अलीने वुर्सेस्टरशायर क्लबकडून खेळताना 8 सामन्यात 46.69 धावांच्या सरासरीने 607 धावा जमविल्या असून त्याने लंडन चषक क्रिकेट स्पर्धेत नॉर्दम्प्टन संघाविरुद्ध शानदार शतक (130) झळकविले होते. वुर्सेस्टरशायर क्रिकेट क्लबने अझहर अलीबरोबर पुन्हा करार केल्याची अधिकृत घोषणा या क्लबचे चेअरमन पॉल प्रिडगॉन यांनी केली आहे.









