आपल्यापैकी बहुतेकांनी ज्युरॅसिक पार्क हा चित्रपट पाहिला आहे. कोटय़वधी वर्षांपूर्वी पृथ्वीतलावरुन नामषेश झालेले डायनोसोर्स हे महाकाय प्राणी पुन्हा जिवंत केले गेल्याचे, आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ उडाल्याचे त्यात दाखविण्यात आले होते. आता पुन्हा डायनोसोर जिवंत झाले आहेत का, अशी चर्चा सुरु झाली आहे.

या चर्चेला कारण घडले आहे ते ब्रिटनच्या वेल्स येथे राहणाऱया लॉरा मूरक्रॉफ्ट नामक महिलेच्या परसात सापडलेल्या प्रचंड पंज्याचे. हा पंजा तुटलेल्या स्थितीत तिला आढळला, त्यावेळी ती अक्षरशः किंचाळली. पृथ्वीवरच्या कोणत्याही प्राण्याचा पंजा इतका मोठा नाही. शिवाय या पंजातून ताजे रक्तही वहात होते. याचाच अर्थ तो नुकताच तुटलेला होता. असा पंजा डायनोसोरसारख्या विशालकाय पण आता संपुष्टात आलेल्या प्राण्याचाच असू शकतो, असे तिला वाटल्याने तिने तज्ञांशी सल्लामसलत केली. पंजा पाहून तज्ञांनाही आश्चर्य वाटले. त्यातूनच मग डायनोसोर जिवंत झाल्याच्या चर्चेला पाठबळ मिळाले आहे. अर्थात असे होण्याची शक्यता दुरापास्त असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले आहे. पण या पंजावर संशोधन सुरु असून हा काय प्रकार आहे, याचा खुलासा नंतर होणार आहे.









