प्रतिनिधी/ बेळगाव
आरपीडी पीयू कॉलेजच्या प्राचार्यपदी सुजाता सु. कलघटगी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून त्या पदभार सांभाळतील. यावेळी एसकेई संस्थेचे व्हा. चेअरमन एस. वाय. प्रभू, सचिव मधुकर सामंत, पीयू कॉलेजच्या चेअरपर्सन लता कित्तूर, व्हा. चेअरमन ज्ञानेश कलघटगी यांच्या उपस्थितीत त्यांच्याकडे सूत्रे देण्यात आली. विद्यार्थ्यांसाठी नवीन कल्पना राबविणार असल्याचे प्रा. सुजाता कलघटगी यांनी सांगितले.









