बेळगाव : कायदा व सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक आर. हितेंद्र यांनी बुधवारी गणेशोत्सव बंदोबस्ताचा आढावा घेतला. उत्तर विभागातील पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनाही मार्गदर्शन केले. आर. हितेंद्र हे बेळगाव दौऱ्यावर आले होते. बेळगाव उत्तर विभागातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर त्यांनी पोलीस आयुक्त कार्यालयाला भेट दिली. पोलीस आयुक्त एस. एन. सिद्धरामप्पा, उपआयुक्त रोहन जगदीश, गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपआयुक्त पी. व्ही. स्नेहा आदी अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात त्यांना मानवंदना देण्यात आली. त्यानंतर एसीपी दर्जाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांनी बंदोबस्ताचा आढावा घेतला. गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत केलेल्या नियोजनाविषयी पोलीस आयुक्तांनी त्यांना माहिती दिली.
Previous Articleलाळ्याखुरकत लसीकरण अभियान 26 सप्टेंबरपासून
Next Article नंदगडमध्ये साकारली दगडूशेठ गणेशाची प्रतिकृती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









