अनुष्का शर्मा ही मुलीला जन्म दिल्यानंतर मोठ्या पडद्यापासून दूरच राहिली आहे. परंतु तिचा ‘चकदा एक्स्प्रेस’ हा चित्रपट नेटफ्लिक्सवर चालू वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटानंतर अनुष्का पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर झळकण्याची तयारी करत आहे. वरुण धवनसोबत पुन्हा एकदा तिची जोडी जमू शकते. दिग्दर्शक एटली यांच्या चित्रपटात हे दोघेही काम करणार असल्याचे मानले जात आहे. वरुण धवन दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक एटलीसोबत काम करणार असल्याचे वृत्त दीर्घकाळापासून चर्चेत आहे. वरुणचा हा आगामी चित्रपट अॅक्शनदृश्यांनी भरलेला असणार आहे. वरुण धवनची नायिका म्हणून अनुष्का शर्माशी संपर्क साधण्यात आल्याचे समजते. मुराद खेतानी यांच्याकडून या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. वरुण धवनच्या या चित्रपटात दोन नायिका असणार आहेत. यातील एका भूमिकेत अनुष्का दिसून येईल. तर दुसऱ्या नायिकेसाठी अद्याप नाव निश्चित झालेले नाही. अनुष्कापूर्वी वरुणची नायिका म्हणून जान्हवी कपूरच्या नावाची चर्चा सुरू होती, परंतु तारखांचे गणित न जुळल्याने जान्हवीने या चित्रपटाची ऑफर नाकारली होती. तर अनुष्काला याची पटकथा आवडली असून तिने होकार दर्शविला असल्याचे समजते. हा चित्रपट 2016 मध्ये प्रदर्शित तमिळ चित्रपट ‘थेरी’चा हिंदी रिमेक असू शकतो. मूळ चित्रपटात थलापथी विजय आणि समांथा रुथ प्रभूने मुख्य भूमिका साकारली होती. अनुष्का अन् वरुणने यापूर्वी 2018 मध्ये सुईधागा या चित्रपटात एकत्र काम केले होते. या चित्रपटाला फारसे यश मिळाले नव्हते, परंतु दोघांच्या जोडीला चाहत्यांची मोठी पसंती मिळाली होती.
Previous Articleअमेरिकेकडून ड्रोन खरेदीला मंजुरी
Next Article भारतावर ‘अॅपल’चा वाढता विश्वास
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









