पंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाकडून कराराला चालना : प्रीडेटर ड्रोन कराराला संरक्षण मंत्रालयाची मंजुरी,900 किलोमीटर क्षेत्रात पाळत ठेवण्याची क्षमता
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी संरक्षण मंत्रालयाने गुऊवारी अमेरिकेकडून प्रीडेटर (एमक्यू-9 रीपर) ड्रोन खरेदी करण्याच्या कराराला मंजुरी दिली. आता यासंबंधी अंतिम निर्णय पॅबिनेट कमिटी ऑन सिक्मयुरिटी (सीसीएस) घेईल. चीन आणि पाकिस्तान या मुख्य शत्रूराष्ट्रांच्या वाढत्या आक्रमकतेच्या पार्श्वभूमीवर भारत-अमेरिका यांच्यातील लष्करी सहकार्याचे हे अत्यंत महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. संरक्षण अधिग्रहण परिषदेच्या गुऊवारी झालेल्या बैठकीत प्रीडेटर ड्रोनच्या कराराला मंजुरी देण्यात आल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. अधिग्रहणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याने आता सुरक्षाविषयक पॅबिनेट समितीकडून पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यानंतर पुढील आठवड्यात सुरू होणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वॉशिंग्टन दौऱ्यादरम्यान, अमेरिका आणि भारत यांच्यात लढाऊ विमानांच्या इंजिनच्या संयुक्त निर्मितीवर अंतिम सहमती होऊ शकते. अमेरिकेकडून एमक्यू-9 रीपर सशस्त्र ड्रोन खरेदी करण्याच्या करारावर चर्चा करण्यासाठी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण परिषदेची बैठक गुऊवारी सकाळी 10 वाजता सुरू झाली. या बैठकीला संरक्षण मंत्रालय आणि लष्कराचे उच्च अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ‘मेड इन इंडिया’ संरक्षण सौद्यांशी संबंधित विषयांवरही चर्चा झाल्याचे संरक्षण मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने बैठकीनंतर स्पष्ट केले. या कराराचे तपशील गोपनीय असल्याचे सूत्रांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. मात्र, हा करार आता अंतिम टप्प्यात आला आहे. व्हाईट हाऊस मॅसॅच्युसेट्स-आधारित एरोस्पेस मॅन्युपॅक्चरिंग दिग्गज जनरल इलेक्ट्रिक कंपनीने सरकारी मालकीच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडसोबत तेजस लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्टसाठी इंजिनचे सह-उत्पादन करण्याच्या प्रस्तावाला मान्यता देण्याची शक्मयता आहे. अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिव्हन सध्या भारतात असून त्यांनी सुरक्षाविषयक करार पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिल्याचे समजते. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी सर्वोच्च भारतीय अधिकाऱ्यांच्या भेटींसाठी सुलिव्हन या आठवड्यात भारतात आले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या अमेरिका दौऱ्यापूर्वी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण खरेदी परिषदेची बैठक संपन्न झाली.
नौदलाला 15 ड्रोन मिळणार
या करारानुसार भारतीय नौदलाला 15 ड्रोन मिळणार असून त्यांना समुद्राच्या निगराणीसाठी तैनात केले जाणार आहे. अमेरिकन संरक्षण कंपनी जनरल अॅटोमिक्सने ‘एमक्यू-9’ ड्रोनची निर्मिती केली असून जवळपास 900 किलोमीटर क्षेत्रात ती पाळत ठेऊ शकतात. या ड्रोनमध्ये बसविण्यात आलेल्या क्षेपणास्त्राच्या मदतीने छोटी लक्ष्ये नष्ट करता येतात. अल-कायदा प्रमुख अल जवाहिरीवर हल्ला करण्यासाठी अमेरिकेने अशा ड्रोनचा वापर केल्याचा दावा केला जात आहे. भारताकडे सध्या दोन प्रीडेटर ड्रोन आहेत. ही ड्रोन अमेरिकन फर्मकडून भाडेतत्त्वावर घेतली असून नौदलाला हिंदी महासागर क्षेत्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यास मदत करत आहेत.
पंतप्रधान 21 जूनला अमेरिकेला जाणार
पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे स्वागत करतील. या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त बैठकीला संबोधित करणार असून हा बहुमान मिळविणारे ते पहिले भारतीय पंतप्रधान ठरतील. पंतप्रधान भारतीय समुदायालाही संबोधित करणार असून तेथील उद्योजक व इतर महत्त्वाच्या नेतेमंडळींशीही स्वतंत्रपणे संवाद साधणार आहेत.









