वृत्तसस्था/ भुवनेश्वर
येथे सुरू असलेल्या 2022 च्या पुरुषांच्या 18 वर्षाखालील वयोगटाच्या खेलो इंडिया युवा हॉकी स्पर्धेत उत्तर प्रदेश, मणिपूर, हरियाणा आणि ओडिशा यांनी उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले आहे.
अ गटातून उत्तर प्रदेश, पंजाब, चंदिगड तर ब गटातून मध्यप्रदेश, ओडिशा, झारखंड आणि बिहार यांनी उपांत्यपूर्व फेरीसाठी आपली पात्रता सिद्ध केली. मंगळवारच्या अ गटातील पहिल्या सामन्यात उत्तर प्रदेशने पंजाबचा 32 असा पराभव केला. दुसऱया एका सामन्यात मणिपूरने आंध्रप्रदेशवर 6-2 असा मोठा विजय मिळवला. अ गटातील तिसऱया सामन्यात हरियाणाने चंदिगडचा 3-1 अशा गोलफरकाने असा पराभव केला. ब गटातील पहिल्या सामन्यात झारखंडने दादरा नगर हवेलीला बरोबरीत रोखले. ब गटातील दुसऱया सामन्यात ओडिशाने बिहारचा 7-2 असा दणदणीत पराभव केला. मध्यप्रदेश व अरुणाचल प्रदेश यांच्यातील सामना बरोबरीत राहिला.









