मुंबई
टाइम टेक्नोप्लास्टचा समभाग 19 टक्के इतका वधारल्याचे समजते. सदरचा समभाग अदानी टोटल गॅसकडून ऑर्डर मिळाल्याने वाढला असल्याचे सांगितले जाते. टाइम टेक्नोप्लास्टचा समभाग बीएसईवर मंगळवारी इंट्रा डे दरम्यान 19 टक्के वाढत 99 रुपयांवर पोहचला आहे. अदानी टोटल गॅसकडून टाइमला 75 कोटी रुपयांची ऑर्डर प्राप्त झाली आहे. पॉलिमर निर्मितीत आघाडीवरची बहुराष्ट्रीय कंपनी म्हणून टाइम टेक्नोप्लास्टचा उल्लेख होतो.









