आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे आवाहन : वाळपई विभागीय कृषी इमारतीचे भूमिपुजन
वाळपई : कृषी क्षेत्रात आधुनिक यंत्रणाचा वापर होणे आवश्यक आहे. तऊणांना कृषी क्षेत्राकडे वळविण्यासाठी आधुनिक शेतीविषयक उपक्रम राबविले पाहिजे. कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदलासाठी तऊणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केले आहे. वाळपई शेतकी खात्याच्या विभागीय इमारतीच्या भूमिपूजन सोहळ्dयात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार डॉ. देविया राणे, शेतकी खात्याचे संचालक नेविल अल्फान्सो, वाळपई नगराध्यक्ष सेहझीन शेख, उपनगराध्यक्ष अनिल काटकर, होंडा जिल्हा पंचायत सभासद सगुण वाडकर, केरी जिल्हा पंचायत सभासद देवयानी गावस, नगरगाव जिल्हा पंचायत सभासद राजश्री काळे, केरी सरपंच दीक्षा गावस, मोर्ले सरपंच अमित शिरोडकर, पर्ये सरपंच रती गावकर, होंडा सरपंच शिवदास माडकर, पिसुर्ले सरपंच देवानंद परब, भिंरोडा सरपंच उदयसिंग राणे, खोतोडा सरपंच नामदेव राणे, म्हाऊस सरपंच सोमनाथ काळे, ठाणे सरपंच सरिता गावकर, नगरगाव सरपंच संध्या खाडीलकर, गुळेली सरपंच नितेश गावडे, सावर्डे सरपंच व इतर मान्यवर उपस्थित होते. विश्वजित राणे पुढे म्हणाले की, आपण कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांसाठी 2 कोटी खर्चून गोव्यामध्ये वेगवेगळी आधुनिक अवजारे उपलब्ध करून दिली होती. यामुळे सत्तरी तालुक्यातील कृषी विकासाला चालना प्राप्त झाली. नवीन शेतकरी तयार झाले. तऊण वर्ग शेतकरी व्यवसायामध्ये उतरले. तशीच योजना पुन्हा एकदा कृषी खात्याने आखावी, अशी विनंती यावेळी त्यांनी केली.
प्रत्येक शेतकऱ्यांच्या जमिनीचे सर्वेक्षण करून त्याची माहिती खात्याकडे उपलब्ध असणे गरजेचे आहे. तसे झाल्यास शेतकऱ्यांना आपल्या जमिनीमध्ये कोणते उत्पादन घेता येईल याचा अभ्यास होऊन शेती विकासाला चालना प्राप्त होईल, असे राणे यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यांना नवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या दारापाशी जाणे गरजेचे आहे, असे विश्वजित राणे यांनी सांगितले. पुढील महिन्यात म्हशीचे मळ येथे 12 कोटी खर्चून प्रकल्पाची सुऊवात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जनतेशी सुसंवादासाठी 26 फेब्रुवारीपासून पंचायत स्तरावर आरोग्य शिबिरांचे आयोजन केले आहे. त्याचप्रमाणे पंचायत स्तरावर पुन्हा एकदा बैठकांना सुऊ कऊन लोकांच्या समस्या जाणून घेणार असल्याचे विश्वजित राणे यांनी सांगितले. आमदार डॉ. देविया राणे म्हणाल्या की, कृषीमंत्री रवी नाईक व मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे आज वाळपई विभागीय कृषी कार्यालयाची 1 कोटी 99 लाख ऊपये खर्चून नवीन इमारत उभारण्यात येत आहे. येथे शेतकऱ्यांसाठी डिजिटायझेशनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यामुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बाहेरी राज्यातील आधुनिक शेतींचे प्रयोग जाणून घेता येईल व आधुनिक तंत्रज्ञानाशी संलग्नित होणार असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या. मोपा विमानतळाचा फायदा शेतकरी बांधवांना व्हावा यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. येथे उत्पादित होणारा माल निर्यात करण्यासाठी मोपा विमानतळाचा फायदा होऊ शकतो. मात्र शेतकरी बांधवांनी जिद्दीने वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने घ्यावीत, असे आवाहन आमदार डॉ. देवीया राणे यांनी केले. कृषी खात्याचे संचालक नेविल अल्फान्सो यांनी प्रस्ताविक केले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सगुण वाडकर, नगराध्यक्ष सेहझीन शेख यांचीही भाषणे झाली. सुऊवातीला मान्यवरांच्या हस्ते नामफलकाचे अनावरण करण्यात आले. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कर्मचारी देऊ झोरे यांनी केले तर वाळपई विभागीय कृषी अधिकारी विश्वनाथ गावस यांनी आभार मानले.









