आंदोलनकर्त्यांची मागणी : धरणे आंदोलन तात्पुरते स्थगित
पेडणे : मोपा मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पिवळ्dया काळ्dया टॅक्सी स्टॅण्ड उपलब्ध कऊन द्यावा या मागणीसाठी ग्रीन फिल्ड मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट टॅक्सी असोसिएशनने मंगळवार दि. 14 रोजी धरणे आंदोलन केले. दुपारी सचिवालयात अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत मोपा विमानतळावर ‘ब्ल्यू’ टॅक्सी स्टॅण्डला परवानगी दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले मात्र पिवळ्dया – काळ्dया टॅक्सींचे ‘ब्ल्यू’ टॅक्सी करण्यासाठी होणार खर्च सरकारने द्यावा, अशी मागणी टॅक्सी असोसिएशनने केली आहे. पेडणे मामलेदार कार्यालयासमोर टॅक्सी असोसिएशन मंगळवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुऊ केले होते. त्यावेळी पेडणेचे उपजिल्हाधिकारी दीपक वायंगणकर यांनी, दुपारी सचिवालयात या संदर्भात बैठक असून सकारात्मक निर्णय होणार आहे. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली मात्र ही आंदोलनकर्त्यांनी फेटाळून लावत जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत आंदोलन सुऊच राहाणार असे सांगितले. शेवटी सायं. 5 वा. उपजिल्हाधिकाऱ्यांनी सरकारने मोपा विमानतळावर ब्ल्यू टॅक्सी स्टॅन्ड देण्याचे जाहीर केलेले आहे. शिवाय उद्या दि. 15 रोजी संबंधित अधिकारी आणि वाहतूक खात्याचे अधिकारी जीएमआर कंपनी ज्या ठिकाणी टॅक्सी स्टँडसाठी जमीन देणार आहे तिची पाहणी करण्यासाठी येणार आहे. तसेच सायं. 3.30 वा. उपजिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक अधिकारी यांच्याकडे चर्चा करून टॅक्सी व्यावसायिकांशीही चर्चा करणार आहेत. त्यामुळे आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. तेव्हा हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात येत असल्याचे आंदोलनाचे निमंत्रक भास्कर नाऊलकर, अॅड. प्रसाद शहापूरकर, उदय महाले आदींनी स्थानिक पत्रकारांकडे बोलताना सांगितले. सुऊवातीला आंदोलनकर्त्यांनी पेडणे येथील श्री भगवती देवीला श्रीफळ ठेवून सामुदायिक गाऱ्हाणे घातले. त्यानंतर पेडणे शहरात हातात फलक घेऊन घोषणा देत जागृती फेरी काढली आणि त्यानंतर मामलेदार कार्यालयासमोर धरणे आंदोलनाला सुऊवात केली.
शांतबद्ध आंदोलन कोणावरही टीका नाही
आजचे आंदोलन हे शांततापूर्ण आंदोलन होते. आंदोलनकर्त्यांनी कुणावरही टीका न करता शांततापूर्णरित्या अधिकाऱ्यांकडे चर्चा केली. आंदोलनकर्त्यांनी धरणे आंदोलन शांततेने सुरू ठेवले. यावेळी टॅक्सी असोसिएशनचे भास्कर नाऊलकर यांनी सांगितले की, सरकारने ब्ल्यू टॅक्सी स्टॅण्ड देण्याचे जाहीर केले असले, तरी आता जी पिवळ्dया – काळ्dया टॅक्सी आहे तिचे ब्ल्यू करण्यासाठी पन्नास हजार ऊपये खर्च येणार आहे. तो खर्च कोणी करावा? एवढी ऐपत टॅक्सी व्यवसायिकांची नाही. त्यामुळे सरकारने हा खर्च करावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे, असे त्यांनी सांगितले. अॅड. प्रसाद शहापूरकर यांनी, जोपर्यंत मोपा विमानतळावर टॅक्सी स्टॅण्डसाठी जमीन अधिग्रहण होऊन टॅक्सी व्यवसाय सुऊ होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुऊच राहाणार आहे. आज 15 रोजी 3.30 वाजता उपजिल्हाधिकारी कार्यालयात वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांसोबत होणाऱ्या चर्चेत जो काही निर्णय होईल त्यावऊन आंदोलनाची पुढची दिशा ठरणार असल्याचे शहापूरकर यांनी सांगितले.









