आमदार केदार नाईकसह मान्यवरांनी घेतले देवदर्शन
म्हापसा : श्री महाऊद्र आम्रेकरनाथ देवस्थान सावळे पिळर्ण बार्देशचा वार्षिक 12 वा वर्धापनदिन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी धार्मिक विधी होऊन दुपारी महाप्रसाद अमृत नागवेकर, उमेश शिरोडकर, तुळशीदास नाईक, कमलाकांत कळंगुटकर, दिपक सावळेकर यांच्या यजमानपदाखाली झाला. रात्री 9 वा. पालखीतून मिरवणूक काढण्यात आली, यावेळी सुहासिनींचा दिवजोत्सव कार्यक्रम झाला. दि. 18 फेब्रुवारीपर्यंत येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान साळगावचे आमदार केदार नाईक तसेच जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर, करण गोवेकर, अजय गोवेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
आमदार केदार नाईककडून शुभेच्छा
आज आम्रेकरनाथ देवस्थान सावळे पिळर्णचा 12 वा वर्धापन दिनानिमित्त समस्त पिळर्ण गावच्या नागरिकांना आपण शुभेच्छा देत असल्याचे आमदार केदार नाईक म्हणाले. या वाठारातील लोकांना यश, आरोग्य द्यावे अशी मागणी त्यांनी केली. जिल्हा पंचायत सदस्य संदीप बांदोडकर म्हणाले की, दरवर्षी येथे उत्सव होतो व मोठ्या प्रमाणात लोक येथे येतात. खूप गर्दी असते. हा कार्यक्रम शिवरात्रोत्सवपर्यंत चालतो. अजय गोवेकर यांनीही यावेळी समस्त गोमंतकीयांना शुभेच्छा देत हे जुने व जागृत देवस्थान आहे. पार्यटक आदी लोक येथे नमस्कार केल्याशिवाय पुढे जात नाही असे सांगितले. देवस्थानचे खजिनदार अमय पेडणेकर यांनी येथे पाच दिवस कार्यक्रम असतात. सर्वांनी याचा लाभ घ्यावा असे ते म्हणाले. पंचायत मंडळ व आमदारांनी जिल्हा पंचायत सदस्यांनी यासाठी खूप सहकार्य केले असल्याचे सांगितले. दरम्यान बुधवार दि. 15 रोजी सकाळी 8 वा. नित्यपूजा, आरती, सायं. 7 वा. ह.भ.प. गुऊदास सुतार (खडकी सत्तरी यांचे ‘कीर्तन होईल. गुऊवार दि. 16 रोजी सकाळी 8 वा. नित्यपूजा, आरती, सायं. 7 वा. अखिल गोवा नृत्य स्पर्धा (वय गट 5 ते 12 वर्ष). शुक्रवार दि. 17 रोजी सकाळी 8 वा. नित्यपूजा, आरती, सायं. 7 वा. वैभवी क्रिएशन डिचोली निर्मित आणि अमर फाळकर प्रस्तुत मराठी नाटक ‘अग्गंबाई सुनबाई’ शनिवार दि. 18 रोजी यजमान सौ. व श्री. सलिल श्या. सावळेकर यांच्याहस्ते ‘महाशिवरात्रीची विधी. पहाटे 4.30 ते सायं. 6 वाजेपर्यंत भक्तगणांना गर्भकुडीत अभिषेक करता येईल. सायं. 7 वा. ँ़ कलासृष्टी बांदोडा फोंडा प्रस्तुत दोन अंकी मराठी संगीत नाटक ‘अहम देवयानी’ सादर होईल. उत्सवातील संपूर्ण कार्यक्रम उद्योजक देवानंद नाईक यांनी पुरस्कृत केलेले आहेत. अधिक माहितीसाठी परेश सावळेकर (9823534010) यांच्याशी संपर्क साधावा.









