क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हिंदवाडी येथील हिंद को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील हॉल येथे कराटे बेल्ट परिक्षेत इंडियन कराटे क्लबच्या 2 विद्यार्थ्यांना ब्लॅकबेल्ट परिक्षेत उतिर्ण. या बेल्ट परीक्षेत एकूण 70 कलर बेल्ट कराटेपटू सहभागी झाले होते.
तर 2 ब्लॅकबेल्ट विद्यार्थी यांना इंडियन कराटे क्लब व बेळगाव जिल्हा स्पोर्ट्स कराटे असोसिएशनचे अध्यक्ष गजेंद्र काकतीकर यांच्या हस्ते ओमकार कावेथीया याला ब्लॅकबेल्ट, प्रमाणपत्र आणि स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आले व नताशा अष्टेकर हिला ब्लॅकबेल्ट फस्ट डॅन आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच त्यांचे पालक राहुल कावेथीया आणि हिरा कावेथीया यांना सुद्धा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. व त्यांचे प्रशिक्षक प्रभाकर किल्लेकर यांचे या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण लाभत आहे.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी इंडियन कराटे क्लबचे प्रशिक्षक हेमलता काकतीकर, विठ्ठल भोजगार, परशुराम काकती, विजय सुतार, निलेश गुरखा, हरीष सोनार, विनायक दंडकर, पुजा पाटील, साहिल दड्डीकर आणि दिपक चंदगडकर यांनी विशेष परिश्रम घेतले.









