क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
सदर्न कमांड अडव्हेंचर चॅलेंज कप कम सिलेक्शन ट्रायल्स 2022 ही स्पर्धा नुकतीच काळी नदी दांडेली येथे पार पडली. चार संघांनी डोंगर-दऱ्यांमधून 12 कि. मी. सायकलिंगचा खडतर प्रवास पूर्ण केला. खडकावरून 60 मी. रॉक क्लायंबिंग, 12 कि. मी. लांबीचे हिल रनिंग, काळी नदी येथे 12 कि. मी. वॉटर रॅफ्टिंग करण्यात आले.
बेळगावमधील शर्कत सभागृहात सदर्न कमांड अडव्हेंचर चॅलेंज कपमधील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट जॉयदीप मुखर्जी यांच्या हस्ते दक्षिण भारत संघाचे प्रमुख मेजर लामतिलनाल यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना जॉयदीप मुखर्जी यांनी, अशा खेळांमुळे सांघिक भावना वाढीला लागते, असे सांगितले.









