क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
एस. बी. जी. आयुर्वेदिक मेडिकल महाविद्यालय व हॉस्पिटलच्यावतीने जिल्हा क्रीडांगणावर तीन दिवशीय क्रीडा महोत्सव उत्साहात पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय पदक विजेते अॅथलिट व वनअधिकारी सत्यनारायण वेर्णेकर उपस्थित होते. यावेळी संस्थेचे चेअरमन अमित घाटगे, आशा घाटगे, रक्षिता घाटगे, प्राचार्य एस. व्ही. गद्दिहळ्ळीशेट्टी, उपप्राचार्य डॉ. अडिवेश अरकेरी आदी उपस्थित होते.
प्रारंभी धन्वंतरी प्रतिमेची पूजा करून दीपप्रज्वलन करण्यात आले. मैदानात क्रीडाज्योत फिरवून पाहुण्यांकडे सुपूर्द करण्यात आली. विद्यार्थ्यांनी शिस्तबध्द पथसंचलन करून अतिथींना मानवंदना दिली. 100 मी., 200 मी., 400 मी. धावणे, कब•ाr, हॉलीबॉल, थ्रोबॉल, गोळाफेक, ऊंच उडी, लांब उडी आदी विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्यांना पारितोषिके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.









