बसचा टायर फुटल्याने घडली दुर्घटना
वृत्तसंस्था/ चेन्नई
तामिळनाडूत कु•ालोरच्या मेलपट्टमपक्कम येथे सोमवारी दोन खासगी बसेसची टक्कर झाली आहे. या दुर्घटनेत दोन जणांना जीव गमवावा लागला असून 70 प्रवासी जखमी झाले आहेत. दुर्घटनेनंतर बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना कु•ालोर येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दुर्घटनेनंतर स्थानिक लोकांनी जखमींना मदत करत पोलिसांना कळविले होते. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले आहेत. प्रारंभिक तपासात एका बसचा पुढील टायर फुटल्याची माहिती समोर आली आहे. टायर फुटल्यानेच चालकाने बसवरील नियंत्रण गमावल्याने ही दुर्घटना घडली असावी असे पोलिसांकडून सांगण्यात आले.









