11 जून रोजी दाखल होण्याचा अंदाज असलेल्या मान्सूनचा 19 जूनपर्यंत मागमूसही नाही. नव्या अंदाजानुसार 29 जूनपर्यंत मान्सून सक्रिय होईल. मान्सून लांबल्याने ग्रामीण भागात पेरण्या लांबल्याचे चित्र आहे. तर शहरांमध्ये पाणी पुरवठा करणाऱ्या कोरड्या ठाक जलसाठ्यांचे चित्र समोर येऊन काळजी व्यक्त केली जात आहे. जून अखेरपर्यंतही मान्सून न झाल्यास जलसंकटाची मोठी शक्यता आहे. यावऊन पावसाच्या पाण्याची साठवणूक, जलवाहिन्यांची गळती रोखणे आणि पाण्याची चोरी थांबविणे यावरील नियोजन शहरी जलसंकटावर उपाय ठऊ शकतात. मात्र लक्षात कोण घेणार हा प्रश्न आहे….
11 जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचा अंदाज असताना आजच्या 19 जूनपर्यंत मान्सूनचा मागमूसही नाही. तर आगामी चार ते पाच दिवसात मुंबईसह कोकण किनारपट्टीवर पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असला तरी देखील तो पूर्व मान्सूनचा अंदाज आहे. त्यामुळेच मान्सून कुठंय? हा प्रश्न शिल्लक उरतोच. मान्सून प्रमाणाचा अंदाज ज्याप्रमाणे राज्याला अपेक्षित आहे, त्याप्रमाणेच मुंबई शहराला अपेक्षित असतो. मुंबई शहराचे संपूर्ण गणितच मान्सून अंदाजावर ठरते. अगदी पिण्याच्या पाण्यापासून ते वीज पुरवठ्यापर्यंत सर्वच पातळीवर पावसाची प्रतिक्षा गरजेची ठरते. म्हणूनच पाऊस प्रमाणाचा अभ्यासपूर्वक विचार होणे आवश्यक झाले आहे. कारण पाणी टंचाईचे पडसाद मुंबईत मोठ्या प्रमाणात उमटतात. मुंबईसारख्या औद्योगिक महानगरांना पाण्याची गरज सतत वाढती आहे. पिण्याच्या पाण्यापासून ते उद्योगधंद्यापर्यंत पाणी लागत असते. धरणातील जलसाठ्यावरच औद्योगिक शहरांचा पाणीपुरवठा अवलंबून आहे. मात्र शहरे सतत वाढत असल्याने स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे पाऊस अंदाज महत्त्वाचा घटक झालाय. मान्सून अंदाज चांगला असला तर पाऊस सर्वत्र समाधानकारक पडेल असेही नाही. मान्सून उशिरा अवतरल्यास मुंबईसारख्या शहरांवर मात्र परिणाम होत असतो. मुंबई शहराला वर्षाकाठी एकूण 14 दशलक्ष लिटर्स इतक्या पाण्याची गरज भासते. धरण क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला तर शहरांना वर्षभर पाणीसाठा उपलब्ध होऊ शकतो. तलाव क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नसल्यास उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनबद्ध वापर करून पाणी टंचाईवर तात्पुरता उपाय होवू शकतो. तसं पाहिल्यास यावर्षी अद्याप पाणी कपातीचा केवळ इशाराच देण्यात येत आहे. तीव्र स्थिती आली नाही. मात्र आगामी पंधरा fिदवसात पाऊस न झाल्यास जुलै मqिहन्यात हालाखीची स्थिती उद्भवू शकते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील राखीव साठ्यासह 15.69 टक्के पाणीसाठा उपलब्ध असल्याची माfिहती मिळत आहे. हा जलसाठा 48 दिवस जेमतेम पुरेल असे सांगण्यात येत आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस न झाल्यास मुंबई महानगरपालिका पाणी कपातीचा निर्णय घेण्याचा अंदाज आहे. अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार, तुळशी या सातही धरणांतील पाणी पातळी सतत आटत आहे. भातसा आणि अप्पर वैतरणा धरणातील राखीव साठा वापरण्यास राज्य सरकारने सध्या परवानगी
दिली आहे. त्यामुळेच मान्सूनची वाट बघण्याखेरीज दुसरा पर्याय नाही.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांच्या गतीवर बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम झाल्याने मान्सून सिंधुदुर्ग जिह्याच्या पुढे सरकत नसल्याचे हवामान तज्ञ सांगत आहेत. यालाच मान्सूनचे रेंगाळणे म्हणतात. मात्र मान्सून वारे 19 ते 22 जूनच्या कालावधीत सक्रिय होऊन पूर्व भारत आणि दक्षिण द्विपकल्पाच्या दिशेने वाटचाल करेल असा अंदाज आहे. त्यावेळी मध्य महाराष्ट्र, मराठवाडा परिसरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. मात्र हा पाऊस पूर्वमान्सून प्रकारातीलच राहणार आहे. यातून कोकणपट्टयातील तुरळक भागात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र हा दक्षिण कोकणातील भाग असून मुंबई प्रदेश असणाऱ्या उत्तर कोकणात पाऊस जोर धरण्यास हा आठवडा सरेल असा अंदाज आहे. उत्तर कोकणातील ठाणे जिह्यातील धरणांमध्ये पाऊस झाल्यास मुंबईतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटू शकतो. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावक्षेत्रात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यास किमान पिण्याच्या पाण्याची चिंता नसते. मात्र धरण तळ गाठू लागल्यास जलसंकटावर मात करणारे जलसंवर्धनासारखे उपाय शहरांमध्ये अवलंब करण्याची अधिक गरज भासते. गृहसंकुलांनी आणि सोसायट्यांनी पावसाच्या पाण्याची साठवणूक केल्यास करांमध्ये सवलत देण्यासारख्या प्रयोगांचा अवलंब महापालिकांनी जरूर करावा. कारण पाऊस प्रमाण सरासरीत असल्यास पावसाच्या पाण्याची साठवूणक न केल्यास टंचाईला नेहमी सामोरे जावे लागेल. मान्सून कमी झाल्यास पाणी टंचाईपासून जलसंवर्धनावर बोलले जाते. लगेचच पुढच्यावेळी पावसाचे प्रमाण वाढले की, सगळे त्याकडे दुर्लक्ष करतात.
मुंबईकरांसाठी राखीव जलसाठा वापरण्यास सुऊवात झाली आहे. मुंबईला होणाऱ्या एकूण पाणी पुरवठ्याच्या 27 टक्के पाण्याची गळती आणि चोरी होत असल्याचे पालिका स्वत: सांगते. या मुंबई महानगर परिक्षेत्रात ज्या प्रमाणात पाणी गळती आणि चोरी होत आहे. या पाण्यावर अख्ख्या पुणेसारख्या शहराची तहान भागू शकते. मात्र या गळती आणि चोरीला रोख दिल्यास पाण्याचा राखीव कोटा वापरण्याची गरज उरणार नाही. तर पावसाचे प्रमाण समाधानकारक राहून किमान धरण क्षेत्रातही पाऊस झाल्यास मुंबईला पिण्याच्या पाण्याची बऱ्यापैकी बेगमी होऊ शकते. मुंबईत अनेक ठिकाणी जुन्या विहिरी तलावे अस्तित्व आजही fिटकवून आहेत. काही विहिरी आणि तलावे विकास कामांसाठी आणि बिल्डरांच्या दबावाने बुजविण्यात आले आहेत. तरीही अस्तित्वात असलेल्या विहिरींची स्वच्छता राखण्याची जबाबदारी पालिकेची आहे. अशा जलसाठ्यांमधून स्थानिक पातळीवरील पाण्याची गरज भागू शकते. यातून पर्यायी पाणी पुरवठ्याची सोय होवू शकते.
23 जून रोजी नैऋत्य मान्सूनचा प्रवेश अंदाज :
मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीवर गुऊवार 22 जूनपर्यंत तुरळक ठिकाणी किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या पूर्व मोसमी पावसाच्या साधारण वळीव सरींच्या स्वऊपाचा अंदाज हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला आहे. 22 जूनपर्यंत हा पूर्व मोसमी पाऊस केवळ कोकण व गोवा उपविभागपर्यंतच मर्यादित राहण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. पूर्वमोसमी वळीव अरबी समुद्रीय शाखेतून मुंबईसह संपूर्ण कोकणात तर मान्सूनच्या बंगाल उपसागरीय शाखेतून तेलंगणातून संपूर्ण विदर्भ व मराठवाड्यात साधारण 23 जून रोजी
नैऋत्य मान्सूनचा प्रवेश होउढ शकतो. मान्सूनच्या अरबी समुद्रीय शाखेमुळेच मान्सूनची बंगाल उपसागरीय शाखाही उर्जीतावस्थेत येण्याची शक्यता जाणवते.
राम खांदारे








