अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील घटना
वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को
अमेरिकेत एका युट्यूरने केवळ लाइक्स आणि कॉमेंट्स मिळविण्याच्या नादात स्वत:चेच विमान कोसळविले आहे. याप्रकरणी अमेरिकन युट्यूबरला दोषी ठरविण्यात आले आहे. विमान दुर्घटनेची माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तपास सुरू केला होता, परंतु आरोपीने तपासात अडथळे आणत दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला होता.
कॅलिफोर्नियातील 29 वर्षीय अमेरिकन युट्यूबर ट्रेवर डॅनियल जॅकबने नोव्हेंबर 2021 मध्ये युट्यूबवर संबंधित व्हिडिओ पोस्ट केला होता. ट्रेवरने कॅलिफोर्निया विमानतळावरून टेलरक्राफ्ट बीएल-65 विमानातून एकट्यानेच उ•ाण केले होते. 35 मिनिटांच्या उ•ाणानंतर लॉस पड्रेस नॅशनल फॉरेस्टनजीक विमानाची दुर्घटना घडवून आणली होती. उ•ाण केल्यावर विमानातून बाहेर पडण्याची योजना त्याने आखली होती आणि पॅराशूटद्वारे जमिनीवर उतरला होता, ज्यामुळे ट्रेवरला कुठलेच नुकसान झाले नव्हते. परंतु त्याचे विमान कोसळले होते. विमान कोसळल्यावर कॅमेऱ्यांचे फुटेज हस्तगत करत ट्रेवरने ते अवशेषांमध्ये लपविले होते. युट्यूबरने दोन दिवसांनी नॅशनल ट्रान्सपोर्ट सिक्युरिटी बोर्डाला कथित दुर्घटनेची माहिती दिली होती. दुर्घटनास्थळ कुठे होते हे माहित नसल्याचे त्याने अधिकाऱ्यांना सांगितले होते. तर सुमारे दोन आठवड्यांनी तो एका मित्रासोबत दुर्घटनास्थळी पोहोचला होता. त्यानंतर एक महिन्याने त्याने युट्यूबवर ‘आय’ नावाने व्हिडिओ अपलोड केला होता. यात तो विमान कोसळताना आणि तो पॅराशूटिंग करताना दिसून येत होता. उ•ाण केल्याच्या अर्ध्या तासाने विमानाचे इंजिन बंद पडल्याचा दावा त्याने केला होता.









