भरड धान्य (श्री-अन्न) अर्थात, मिलेट्स हा एक सामान्य शब्द आहे, जो लहान आकाराच्या धान्यांसाठी वापरला जातो. भरड धान्य (श्री-अन्न) अर्थात, मिलेट्स हे तृणधान्य कुटुंबातील आहे. हा अन्नधान्य पिकांचा एक समूह आहे, जो उष्णकटिबंधीय आणि उपोष्णकटिबंधीय हवामानाच्या श्रेणीमध्ये लागवडीसाठी अनुकूल आहे. तांदूळ आणि गव्हाच्या तुलनेत ही पिके कमी निवि÷ांसह घेतली जाऊ शकतात. भरड धान्य पिके ही हवामानास अनुकूल, कठोर आणि कोरडवाहू पिके आहेत. आजकाल याला पोषक तृणधान्ये म्हणतात. ते पोषक तत्वांनी समृद्ध आहेत आणि आरोग्यासाठी फायदे देतात. कारण ते मधुमेह, लठ्ठपणा इत्यादी विकारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. प्राणी आणि पक्षीदेखील भरड धान्यांचा आनंद घेतात. ते सूक्ष्म अन्नद्रव्ये, विशेषतः खनिजे आणि बी जीवनसत्त्वे, तसेच कर्बोदकांमध्ये आणि फायटोकेमिकल्सचे पोषक गुणधर्मांसह चांगले अन्न स्त्राsत आहेत.
मिलेट्स/ पोषक तृणधान्ये/भरड धान्ये, हे अतिशय पुरातन पीक आहे. ते ख्रिस्तपूर्व 3500-2000 काळापासून अस्तित्वात आहे. आशिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका इथे एकेकाळी या भरड धान्यांचे उदंड पीक घेतले जायचे. देश प्रदेशाच्या भौगोलिक रचनेनुसार वेगवेगळी तृण/भरड धान्ये पिकवली जायची. पुरातन वेदात पण तृणधान्यांचा उल्लेख केलेला आहे. आता पुन्हा एकदा मिलेट्सची चर्चा होताना दिसते आहे. मिलेट्स हे गरीबांचे सुपरफूड आहे. पूर्वी ते ‘गरीब माणसाचे अन्न’ म्हणून प्रसिद्ध होते. संयुक्त राष्ट्र संघाने 2022-23 हे वर्ष, ‘इंटरनॅशनल इयर ऑफ मिलेट्स अर्थात भरडधान्य वर्ष’ म्हणून जाहीर केले आहे. नुकत्याच सादर करण्यात आलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पातही मिलेट्स (श्री-अन्न) शेतीला मदत-प्रोत्साहन देण्याचं सरकारने जाहीर केलं आहे.
एकूण 11 प्रकारचे भरड धान्ये या गटात समाविष्ट आहेत. त्यातील 9 मिलेटची नावे भारतीय आहेत. या भरड धान्यात ज्वारी (कार ज्वारी, मालदांडी शाळू, सुलतान शाळू, लाह्याची ज्वारी), बाजरी, नाचणी, जव, कोदो, सामा, सोया, कुटकी, कांगनी, वरी, वरई राळा/ भादली / कांग, कोडो, कुटू, राजगिरा, संनवाकोदो/ कोद्रा/ हरिक, बर्टी, ब्राऊनटोप मिलेट व घीनासारखी धान्ये सामील आहेत. यांना भरड धान्ये म्हणतात. कारण याच्या उत्पादनासाठी जास्त मशागत करावी लागत नाही. ही धान्ये कमी पाणी व कमी सुपीक जमिनीतही उगवतात. ही सर्व धान्ये कमी ते जास्त पावसाच्या प्रदेशात, हलक्मया ते कमी प्रतीच्या जमिनीत येतात. भरड धान्ये आरोग्यासाठी फायदेशीर असून भारतीय शेतीचा महत्त्वाचा एक भाग आहे. सर्वच शोधांमध्ये भरड धान्यांचे महत्त्व व पौष्टिकता जाहीर झाली आहे. भरड धान्याने मुले व किशोरांचा विकास 26-39 टक्के तीव्र होऊ शकतो. चार देशांमध्ये सात संघटनांद्वारे केलेल्या या संशोधनाचे नेतृत्व इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिटय़ूट ऑफ सेमी-एरिड ट्रापिक्सने केले आहे. यापासून उपमा, खीर, आंबील, डोसे, इडली, पुलाव, खिचडी असे अनेक पदार्थ करू शकतो. मिलेट हे वापरात असलेल्या गहू, तांदूळ या नियमित धान्यासाठी एक चविष्ट आणि पौष्टिक पर्याय आहे. भात आणि गहू ही धान्य पिके आपल्याला अन्नसुरक्षा देतात. परंतु मिलेट हे धान्य देशाला अन्नसुरक्षेबरोबरच पोषणसुरक्षा, आरोग्य सुरक्षा, शेतकऱयांच्या उपजीविकेची सुरक्षा, जनावरांच्या चाऱयाची सुरक्षा, पर्यावरण संतुलन आणि संवर्धनाची सुरक्षा पुरवते. या धान्यांच्या काडाचा/ कडब्याचा उपयोग जनावरांच्या चाऱयासाठी केला जातो. ज्यात मोठय़ा प्रमाणात सेल्युलोज व इतर पदार्थ असतात. हा चारा जनावरे आवडीने खातात. त्यामुळे काही भागात तर जनावरांच्या चाऱयासाठीही ही पिके घेतली जातात. वाळलेल्या चाऱयाची बॅडीम रचली जाते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याच्या मार्केटिंगकडे फारसे लक्ष दिले नाही.
देशातील 24 टक्के दुष्काळ प्रवण क्षेत्र महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राच्या पश्चिम भागात ज्वारी, मोती बाजरी (बाजरी), बोट बाजरी (नाचणी) आणि इतर लहान बाजरी, थोडे बाजरी (कुटकी), कोडो बाजरी, बार्नयार्ड बाजरी (सवा), फॉक्सटेल बाजरी (कागनी) आणि प्रोस्को बाजरी (चेना) ही पिके नियमित घेतली जातात. कोविड- 19 या साथीच्या दरम्यान आणि नंतर प्रत्येकजण स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काळजी घेतो. जीवनशैलीतील आजार कमी करू शकणारे ही अन्न पिके आहेत. म्हणूनच न्यूट्रास्युटिकल फार्मिंग अर्थात औषधी पीक शेती किंवा पौष्टिक शेती (म्हणजेच पोषण अधिक औषधी उत्पादन) वाढत आहे. वर्ष 2021-22 (तात्पुरते) मध्ये ज्वारी, बाजरी, किरकोळ बाजरी आणि नाचणी पिकांच्या, अनुक्रमे 209, 504, शून्य आणि 73 हजार हेक्टर क्षेत्र या पिकांच्या लागवडी खाली होते. या पिकांचे उत्पादन अनुक्रमे 173, 458, शून्य आणि 94 हजार टन होते.
भरड अन्न धान्ये, अनेक प्रकाराच्या “खाण्यासाठी तयार उत्पादने’’ साठी वापरले जाते, उदाहरणार्थ, ज्वारी पफ्स, फॉक्सटेल पफ्स, बाजरी पफ्स, ज्वारी एक्सट्रुडेड स्नॅक, फॉक्सटेल एक्सट्रुडेड स्नॅक्स, फिंगर मिलटेक्स्ट्रुडेड स्नॅक्स, मिलेट्स कुकीज, फॉक्सटेल/फिंगर/पर्ल मिलेट्स कुकीज, फॉक्सटेल मिलेट्स केक, एग्लेस केक, मफिन, कुकीज, गोड पुरी, मिलेट्स रोटी नाचणीचे लाडू (मूध्ये), लहान मिलेट्स फ्लेक्स, फिंगर मिलेट्स फ्लेक्स, ब्राऊन टॉप मिलेट्स फ्लेक्स, फोकटेल मिलेट्स फ्लेक्स, मोती बाजरी फ्लेक्स, फिंगर मिलेट्स नूडल्स, मल्टी मिलेट्स नूडल्स, बीटरूट मिलेट्स नूडल्स, मोती बाजरी नूडल्स, निरोगी हक्का नूडल्स, प्रोसो दलिया, फॉक्सटेल मिलेट्स दलिया, रागी लापशी दलिया, बार्नयार्ड दलिया, ग्लूटेन फ्री मिलेट्स पास्ता, ज्वारी ग्लूटेन फ्री मिलेट्स भाजी, बार्नयार्ड ग्लूटेन फ्री मिलेट्स पास्ता, कोडो मिलेट्स पीठ, फॉक्सटेल मिलेट्स पीठ, लहान मिलेट्स पीठ, बार्नयार्ड मिलेट्स पीठ आणि सेंद्रिय मिलेट्स पीठ इ. मान्सूनच्या अनिश्चिततेवर मात करण्यासाठी महाराष्ट्राच्या दुष्काळी भागात ‘हवामान लवचिक शेती’ द्वारे प्रोत्साहन देण्यासाठी जागतिक बँकेने महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन प्रकल्प (स्मार्ट) राबवत आहे. या उपक्रमामुळे शेतीचा कायापालट होण्यास मदत होईल. या प्रकल्पात मिलेट्सचे उत्पादन, कृषी व्यवसाय मॉडेल अंतर्गत प्रक्रिया करण्यावर अधिक भर देण्यात आला आहे. आंतरराष्ट्रीय मिलेट्स वर्षाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकार 103.22 कोटी रु.चा कार्यक्रम राबवत आहे. या अंतर्गत पीक प्रात्यक्षिके, संकरित / सुधारित वितरण बियाणे, आय.पी.एम. ची अंमलबजावणी, यासाठी जिल्हा आणि राज्यस्तरीय कार्यशाळा तंत्रज्ञानाचा प्रसार इत्यादींचा त्यात समावेश आहे. 26 जून 2022 रोजी राज्यात पोषण तृणधान्य दिन साजरा करण्यात आला.
राज्यानेही “शेत तेथे पौष्टिक तृणधान्य’’ चा नवीन नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केला आहे. यातून शेतकऱयांना विनामूल्य न्यूट्री तृणधान्य पिकांचे बियाणे मिनीकिट प्रदान केले गेले. राज्यात पंतप्रधान मायक्रो फूड प्रोसेसिंगचे औपचारिकीकरण एंटरप्रायझेस आणि मुख्यमंत्री कृषी आणि अन्न प्रक्रिया योजना सुरू आहे. या अंतर्गत मिलेट्सचे उत्पादन आणि प्रक्रिया वाढीसाठी ठाणे–नाचणी, नंदुरबार-बाजरी आणि नाचणी, आणि सोलापूर-ज्वारीसाठी प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आजपर्यंत 75 प्रकल्प मंजूर आहेत. आत्तापर्यंत नऊ शेतकरी उत्पादक कंपन्या, 137 वैयक्तिक शेतकरी आणि 60 निर्यातदार या योजनेत समाविष्ट आहेत.
या कार्यक्रमात सहा शासकीय विभागांचा सहभाग आहे. याशिवाय, मिलेट्स वर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्र सरकारही विविध योजना राबवण्याची शक्यता आहे. मिलेट्स हे एक स्मार्ट अन्न आहे. मानवी अन्न कॅलरी आणि प्रथिनांसाठी ते आवश्यक आहे. अशा पोषक अन्न पिकांचे सेवन करून भारत आणखी मजबूत होईल.
डॉ. वसंतराव जुगळे








