वृत्तसंस्था/ ब्युनोस आयरिस
एटीपी टूरवरील येथे रविवारी झालेल्या अर्जेंटिना खुल्या पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत स्पेनचा टॉप सीडेड टेनिसपटू कार्लोस अलकॅरेझने ब्रिटनच्या कॅमेरून नुरीचा पराभव करत अजिंक्मयपद पटकाविले.
एटीपीच्या मानांकनात दुसऱया स्थानावर असलेल्या ऍलकॅरेझने अंतिम सामन्यात 12 व्या मानांकित ब्रिटनच्या कॅमेरून नुरीवर 6-3, 7-5 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. सदर स्पर्धा क्ले कोर्टवर खेळविली गेली. या संपूर्ण स्पर्धेमध्ये 19 वषीय ऍलकॅरेझने एकमेव सेट गमाविला आहे. अमेरिकन ग्रॅण्डस्लॅम टेनिस स्पर्धेनंतर ऍलकॅरेझचे हे एटीपी टूरवरील पहिले जेतेपद आहे. आता आगामी होणाऱया रिओ खुल्या टेनिस स्पर्धेत ऍलकॅरेझ सहभागी होणार आहे.









