सर्व्हर हॅक करून चार एटीएमधील पळविले होते पैसे
प्रतिनिधी/ पणजी
आरबीएल बँकेचा एटीएम नेटवर्क हॅक करून 9 लाख 24 हजार ऊपये गायब करणाऱ्या संशयिताला सायबर गुन्हा विरोधी विभागाने हरियाणा येथील एका व्यक्तीला अटक केली आहे. संशयिताला गोव्यात आणून त्याच्या विरोधात भादंसं 420 तसेच आयटी कायदा कलम 66 व 66 (डी) खाली गुन्हा नोंद करून त्याला रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संशयिताचे नाव मुबारिकला मोहम्मद (मेवात हरयाणा) असे आहे. सायबर गुह्यासाठी प्रसिद्ध असलेल्या हरियाणातील मेवात जिल्हा मुलींग गावातून संशयिताला अटक करून आणणे फार कठीण कामगिरी होती. त्यामुळे पोलिसांना हरयाणा राज्यातील पोलिसांची मदत घेऊन जानेवारी महिन्यात संशयिताला अटक करण्याची मोहीम सुऊ केली होती. संशयित आपल्या गावाबाहेर येणार आणि त्याला अटक करणार म्हणून पोलीस वाट पाहत होते. अखेर त्याला एक महिन्यानंतर अटक केली.
राज्यात सायबर गुन्हे वाढत असतानाच, डिसेंबर महिन्यात आरबीएल बँकेचे एटीएमचे सर्व्हर हॅक करून 9 लाख 24 हजार ऊपयांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना घडली होती. याबाबत बॅकेचे अधिकारी विक्रांत कदम यांनी सायबर गुन्हा विरोधी विभागाकडे तक्रार दाखल केली आहे.
बँकेच्या पणजी, म्हापसा, कळंगूट आणि मडगाव येथील एटीएमचे सर्व्हर हॅक करून ग्राहकंच्या खात्यावरील पैसे परस्पर काढल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली होती. अशा प्रकारच्या अनेक तक्रारी आल्यानंतर बँकेने तातडीने सायबर गुन्हा विरोधी विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली होती. बँकेच्या चार एटीएममधून 9 लाख 24 हजार ऊपये काढल्याचे उघड झाले होते. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सायबर गुन्हा विरोधी विभागाने सुऊ केली होती. सायबर गुन्हा विरोधी विभागाने अज्ञात संशयितांविरोधात गुन्हा नोंद करून तपासकामाला सुऊवात केली होती. तपास कामादरम्यान संशयिताची ओळख पटली होती मात्र त्याला अटक करणे कठीण होते. संशयिताचा ठावठिकाणा मिळताच पोलीस हरयाणाला गेले तेथील पोलिसांच्या साहाय्याने संशयिताला अटक केली.









