बेळगाव : गांधीनगर येथील नवदाम्पत्याने आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात मतदानाचा हक्क बजावून करत एक आदर्श घालून दिला आहे. या नवदाम्पत्याने गांधीनगर येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. इतरांनीही आपली कामे बाजूला ठेवून प्रथमत: मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले. मारुती रोड, गांधीनगर येथील आनंद जांभळे व प्रगती जांभळे यांचा मंगळवार दि. 9 रोजी गांधीनगर येथे विवाह झाला. बुधवारी जांभळेंच्या घरी सत्यनारायण पूजा होती. यामुळे त्यांच्या घरी लग्नाचे वऱ्हाड जमले होते. नातेवाईक, मित्रमंडळींच्या गोतावळ्यामधून त्यांनी वेळ काढून मतदानाचा हक्क बजावला. बुधवारी सायंकाळी गांधीनगर येथील मतदान केंद्रावर येऊन त्यांनी मतदान केले. आपल्या वैवाहिक जीवनाचा शुभारंभ आम्ही मतदानाचे पवित्र कार्य करून करत असल्याची प्रतिक्रियाही यावेळी या नवदाम्पत्याने दिली.
Previous Articleदेशासाठी काहीही…मतदानासाठी उझबेकिस्तानातून बेळगावात!
Next Article येळ्ळूरमध्ये चुरशीने 76 टक्के मतदान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









