महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी कसली मतदानासाठी कंबर
बेळगाव : म. ए. समितीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येळ्ळूर गावामध्ये अत्यंत चुरशीने व शांततेत मतदान पार पडले. एकूण 76 टक्के मतदान झाले आहे. कार्यकर्त्यांनी सकाळपासूनच मतदान करण्याचे आवाहन केले होते. सकाळच्या सत्रामध्ये मतदानाला जोर नसला तरी दुपारनंतर मतदानाला अधिक वेग आला. काही मतदान केंद्रांमध्ये मतदान प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्यामुळे मतदारांना ताटकळत थांबावे लागले होते. य् ाsळ्ळूरमधील मतदान केंद्र क्रमांक 117 मधील 737 पैकी 567 मतदारांनी हक्क बजावला. 118 मतदान केंद्रावरील 743 पैकी 541, मतदान केंद्र 126 1009 पैकी 772, मतदान केंद्र 119 मधील 925 पैकी 688, मतदान केंद्र 127 मधील 928 पैकी 669, मतदान केंद्र 120 मधील 675 पैकी 488, मतदान केंद्र 123 मध्ये 865 पैकी 696, मतदान केंद्र 124 मध्ये 1009 पैकी 764, मतदान केंद्र 128 मधील 1055 पैकी 762, मतदान केंद्र 125 मध्ये 784 पैकी 574, मतदान केंद्र 121 मधील 1026 पैकी 764, मतदान केंद्र 122 मध्ये 441 पैकी 356 मतदारांनी मतदान केले आहे. अवचारहट्टी येथील मतदान केंद्रामध्ये 432 पैकी 384 मतदान झाले आहे. एकूण 10 हजार 628 पैकी 8 हजार 25 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. येळ्ळूरमध्ये यावेळी मोठी चुरस निर्माण झाली होती. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे. एकूण 76 टक्के मतदान झाले आहे
राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराविरोधात तक्रार दाखल
मतदान प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. मात्र राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराने आपल्या नावासह चिठ्ठ्या दिल्या. यासाठी यंत्राचा वापर केला. ती यंत्रे जप्त करावी यासाठी म. ए. समितीच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना विनंती केली. प्रारंभी टाळाटाळ केली. मात्र याबद्दल वरिष्ठांकडे तक्रार करणार असे म्हणताच राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या नावाची पावती देण्याची यंत्रे जप्त केली. तसेच दोन कार्यकर्त्यांविरोधात तक्रारदेखील देण्यात आली. शेवटी निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेतली आहे.









