बेळगाव : शहरात राहूनही काहीजण मतदानाचा हक्क बजावत नाहीत. पण, उझबेकिस्तान येथून बेळगावमध्ये येऊन एकाने मतदानाचा हक्क बजावला. तो मूळचा शाहूनगरचा. जगात असेल तेथून भारतात परतून मतदानाचा हक्क बजावतात. हा एक वेगळा आदर्श त्यांनी घालून दिला असून शहरात राहून मतदान न करणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालण्याचे हे काम आहे. शाहूनगर येथील बसवराज सरदार हे व्यवसायानिमित्त उझबेकिस्तान येथील एका शहरात आहेत. बुधवारी बेळगावमध्ये मतदान असल्याने मंगळवारी दुपारी ते विमानाने दाखल झाले. उझबेकिस्तान येथे स्थायिक असलेले भारतीय आणि त्यांची संघटना आपापल्या राज्यात निवडणूक असल्यास एकमेकांना मतदानाला भारतात जाण्यासाठी प्रोत्साहन देतात. बसवराज यांनी ‘तरुण भारत’शी संवाद साधत प्रत्येकाने मतदान केले पाहिजे, असे सांगितले.
Previous Articleकंग्राळी बुद्रुकमध्ये 73 टक्के मतदान
Next Article नवदाम्पत्याने बजावला मतदानाचा हक्क
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









