आपल्या शहरात आपण फूटपाथ किंवा पदपथ पाहिलेला असतोच. त्यावरुन आपण कित्येकदा चाललेलोही असतो. पादचाऱयांच्या सुरक्षेसाठी तो बांधलेला असतो. मुख्य मार्गावर वाहनांची वर्दळ असते. वाहनांचा धोका होऊ नये म्हणून पदपथाची सोय बऱयाच स्थानी असते. विकसीत देशात तर असे पदपथ किंवा सायकल मार्ग अतिशय दक्षतापूर्वक बांधलेले असतात. तथापि, ब्रिटनसारख्या विकसीत देशातील एक असा मार्ग याला अपवाद आहे. जगातील सर्वात धोकादायक पदपथ अशी ख्याती त्याने अल्पावधीतच मिळविली आहे.
हा पदपथ दृकभ्रम (ऑप्टिकल इल्यूजन) निर्माण करतो. त्यामुळे त्यावर अनेक अपघात झाले आहेत. अनेक नागरीक चालताना पडले असून त्यांना जखमा झाल्या आहेत. कंत्राटदाराने तो एका मस्तीत बनवला होता, असे सांगण्यात येते. तथापि, आता तो लोकांसाठी मोठीच समस्या बनला आहे. काही वयोवृद्ध नागरीकांनी त्याविरोधात तक्रार सादर केली आहे. कंत्राटदाराविरोधात कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. अशा तऱहेचा मार्ग ब्रिटनसारख्या देशात आहे, याचे साऱयांना आश्चर्य वाटत आहे. हा पदपथ असा का निर्माण करण्यात आला, हे कोणालाही सांगता येत नाही. पण अनेक लोकांनी मात्र घुडघे फोडून घेतले आहेत.









