वृत्तसंस्था/ लॉस एंजिल्स
जागतिक स्तरावर नवोदित युवा फुटबॉलपटूंना अधिक संधी मिळावी यासाठी स्ट्रीट फुटबॉल लिग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. ब्राझीलचा माजी जागतिक दर्जाचा फुटबॉलपटू तसेच बार्सिलोना क्लबचा माजी सदस्य रोनाल्डिनोच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
शनिवारी येथे एका कार्यक्रमात जागतिक स्तरावरील स्ट्रीट फुटबॉल लिगच्या प्रसारासाठी आयोजकांनी ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेच्या माध्यमातून सर्व वयोगटातील फुटबॉलपटूंना फुटबॉल या क्रीडा प्रकारासंदर्भातील स्कील आणि ट्रीक्स या संदर्भातील माहिती सोशल मीडियावर उपलब्ध करून देण्याची सुविधा राहिल. संपूर्ण जगामध्ये प्रमुख शहरात ही मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या मोहिमेचे नामकरण रोनाल्डीनो ग्लोब स्ट्रीट लिग चॅम्पियनशिप असे करण्यात आले आहे. ब्राझीलच्या रोनाल्डीनो आपल्या फुटबॉल कारकीर्दीत दोनवेळा जगातील सर्वोत्तम फुटबॉलपटूचा बहुमान मिळवला आहे.









