जर्मन समूहासोबत हात मिळवणी करत तंत्रज्ञानाची सोबत घेणार असल्याचे संकेत
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
टाटा स्टीलने कार्बनचे उत्सर्जन कमीत कमी ठेवत स्टील उत्पादन प्रक्रिया विकसित करण्यासाठी जर्मनीच्या एसएमएस समूहासोबत भागीदारी केली आहे. टाटा स्टीलने गुरुवारी एका निवेदनात म्हटले आहे की या सामंजस्य करारांतर्गत दोन्ही कंपन्या पुढील तांत्रिक चर्चा करणार आहेत. एसएमएस ग्रुपने विकसित केलेल्या इजीमेल्ट (इलेक्ट्रिक-असिस्टेड सिंगास स्मेल्टर) तंत्रज्ञानाचे संयुक्तपणे औद्योगिक प्रदर्शन आयोजित करणार असल्याची माहिती आहे. टाटा स्टीलच्या जमशेदपूर प्रकल्पाच्या ई ब्लास्ट फर्नेसमध्ये हे प्रदर्शन भरवण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. कार्बन उत्सर्जन 50 टक्क्यांहून अधिक कमी करण्याचे उद्दिष्ट आहे. इजीमेल्ट तंत्रज्ञान हे लोहनिर्मितीचे द्रावण आहे जे विद्यमान स्टील प्लांट्स डिकार्बोनाइज करण्यासाठी लागू केले जाऊ शकते असा अंदाजही मांडण्यात आला आहे. टाटा स्टीलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) आणि व्यवस्थापकीय संचालक टी व्ही नरेंद्रन म्हणाले, ‘आम्ही हरित पोलाद उत्पादनाकडे वळण्यासाठी सक्रियपणे उपाय शोधत आहोत. याशिवाय भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा स्टील उत्पादक देश आहे. अशा वेळी टाटा स्टीलसारख्या मोठ्या कंपन्यांवर कार्बन उत्सर्जन कमी करून देशाच्या वाटचालीत हातभार लावण्याची मोठी जबाबदारी आहे.









