प्रतिनिधी/ म्हापसा
हडफडे येथे सोमवारी सकाळी 1 एप्रिल रोजी सापळा रचून करण्यात आलेल्या कारवाईत हणजूण पोलिसांकडून अंदाजे दीड लाख ऊपयांचा अमलीपदार्थ जप्त करण्यात आला. यावेळी संशयित अरविंद रामकृष्ण चव्हाण (सध्या राहाणारा गांवरावाडा-कळंगूट) या परप्रांतीय तरुणाच्या पोलिसांकडून मुसक्मया आवळण्यात आल्या. हणजूण पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रशल देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण पाटील, रुपेश आजगावकर तसेच दिपेश चोडणकर यांनी भाग घेतला. म्हापसा पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.









