आपला देश वैशिष्ट्यापूर्ण आहे. अत्याधुनिकता आणि परंपरा येथे एकमेकींच्या शेजारी शेजारी राहतात. येथे प्रत्येक गाव, प्रत्येक मानववस्ती आणि प्रत्येक शहराचे एक वेगळे असे स्वत:चे वैशिष्ट्या असते. तेथे राहणारी माणसे हे वैशिष्ट्या पिढ्यानपिढ्या जपत असतात. जणू ही जपणूक त्यांच्या रक्तातच आहे. यांपैकी काही स्थानांची वैsिशष्ट्यो समाधान देणारी असतात. तर काही भयकंप निर्माण करणारीही असतात. राजस्थानातील जोधपूर जिल्ह्यातील एका गावाचे असेच एक वैशिष्ट्या आहे. या वैशिष्ट्यासाठी हे गाव आता देशभरात प्रसिद्ध होत आहे.
जोधपूर शहरापासून 20 किलोमीटर दूर डोली हे गाव आहे. या गावाचे गेल्या 200 वर्षांपासूनचे काही नियम आहेत. हे नियम आजही कोणताही अपवाद न करता, अत्यंत कसोशीने पाळले जातात. या गावात 200 वर्षांपूर्वी बैरागी हरीराम महाराज यांचे वास्तव्य होते. या हरीराम महाराजांनी या गावासाठी काही नियम बनविले होते, जे आजही पाळले जातात. या नियमांच्या अनुसार गावात एकही दुमजली घर असता कामा नये. या गावात सुवर्ण कारागिरांनी किंवा सोनारांनी रात्रीचे वास्तव्य करु नये. तसेच गावात खाण्याच्या तेलाची निर्मिती करण्यासाठी घाणा लावला जात नाही. संस्थानिकांच्या काळात जोधपूरच्या राजांनी कवीराज मुरारीलाल चारण यांना 12 गावे इनाम दिली होती. त्यात डोली गावाचाही समावेश होता. चारण यांनी बैरागी हरीराम महाराज यांच्या हस्ते या गावात करणीमातेचे मंदीर निर्माण केले होते. याच गावात हरीराम महाराज यांनी तप केले होते. त्यांनी गावासाठी नियम निर्माण केले. काही लोकांनी या नियमांचे पालन न करता दुमजली घराचे बांधकाम केले. तथापि, ते अशा घरांमध्ये राहू शकले नाहीत. त्यांच्यावर अनेक संकटे आली. तेव्हापासून गावात या नियमाचे काटेकोर पालन होऊ लागले. सोनारांनी या गावात रात्री रहायचे नाही. तसेच तेलाचा घाणा कोणी टाकायचा नाही, या नियमांमागेही अशीच कारणे आहेत. आजही या नियमांचे पालन गावातील लोक करतात. या गावातील माणसांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. कारण रोजगारासाठी तरुण शहरांमध्ये स्थायिक होऊ लागले आहेत. हे चित्र आज भारतातील अनेक गावांमध्ये दिसून येते. मात्र, डोली गावात जे लोक राहतात, त्यांच्याकडून या नियमांचे पालन केले जाते. गावात कोणी तात्पुरता वास्तव्यास आला असेल, तर त्यालाही हे नियम पाळावे लागतात. शहरात रोजगारासाठी गेलेले युवक गावात आले की या नियमांनी बांधले जातात.









