नवी दिल्ली
दूरसंचारसह विविध उद्योगात असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रिज लिमिटेडने श्रीकांत वेंकटचारी यांची चिफ फायनॅन्शीयल ऑफिसर अर्थात सीएफओ म्हणून निवड केली आहे. सदरची माहिती रिलायन्सने शेअरबाजाराला दिली असून श्रीकांत हे आपली नवी जबाबदारी 1 जूनपासून सांभाळणार आहेत. 2005 पासून याच पदावर असणाऱ्या अलोक अगरवाल यांची जागा ते घेणार आहेत. आता अगरवाल हे वरिष्ठ सल्लागाराची भूमिका बजावणार आहेत.









