शिवाजी विद्यापिठाच्या मुठ कोर्ट स्पर्धेत सुयश ; तीन विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या पेटंटला द्वितीय क्रमांक
प्रतिनिधी/ सातारा
न्यायालयात ज्या प्रमाणे केस वकील लढवतात. वकील आपल्या पक्षकाराला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रचंड युक्तीवाद करत असतात. तोच युक्तीवाद नेमक्या कशा पद्धतीने करायचा असतो. जेणे करुन दिवाणी प्रकारातल्या केसेसमध्ये बहुतांशी तक्रारदार हा निकाल हाती येईपर्यंत वैतागून जातो. मात्र, सातारच्या लॉ कॉलेजच्या तीन विद्यार्थ्यांनी शिवाजी विद्यापीठांच्यावतीने राष्ट्रीय पातळीवरील आयोजित केलेल्या आठवी ऑल इंडिया शिवाजी विद्यापीठांची एमडबलओटी कोर्ट एडीआर ऍण्ड विधी मेळा 2023 मध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ईस्माईलसाहेब मुल्ला लॉ कॉलेजच्या लॉच्या तिसऱया वर्षात शिकत असलेल्या सौरभ मतकर, निलम पवार आणि साक्षी गुरव यांनी पेटंट सादर केले. त्यांचा द्वितीय क्रमांक आला.
शिवाजी विद्यापीठ वेगवेगळय़ा स्पर्धा दरवर्षी आयोजित करते. विद्यार्थ्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्याबरोबरच शैक्षणिक बाबीमध्ये विद्यार्थी नेमके किती पातळीवर पुढे आहेत, यासाठी त्या त्या फॅक्लटीच्या स्पर्धा आयोजित करतात. त्यापैकी लॉ फॅक्लटीसाठी देश पातळीवरची स्पर्धा कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आली होती. त्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी प्रती कोर्टच सादर करायचे असते. यामध्ये देशभरातील लॉच्या विद्यार्थ्यांचा सहभाग होता. सातारचे लॉ कॉलेज या स्पर्धेत सहभागी होत असते. परंतु राज्य पातळीवरील या स्पर्धेत दिग्गज स्पर्धकांसमोर निभाव लागणे तसे अवघडच असते. लॉ कॉलेजच्या प्राचार्या दिपा पाटील यांनी कॉलेजच्यावतीने सातारचा सौरभ मतकर, मेढय़ाची निलम पवार आणि साताऱयाची साक्षी गुरव या तिघांच्या ग्रुपची निवड करण्यात आली.
राष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धेत नेमके काय प्रेझेंटेशन करायचे यावर त्यांच्या टीमने मार्गदर्शन म्हणून सीए ऍड. सौरभ रायरिकर यांचे मार्गदर्शन घेतले. त्याचबरोबर कॉलेजचे ऍड. शेरखान डांगे व सौरभ मतकर याचे वडील ऍड. वामन मतकर यांनी दिवाणी केस कशा पद्धतीने जिंकता येते. फिर्यादीला कमीत कमी कसा त्रास होईल. फिर्यादीच्या बाजूने निकाल कसा खेचून आणता येईल. न्यायालयात न्यायाधिशांसमोर बाजू कशापद्धतीने भक्कमपणे मांडता येईल याचे एक पेंटटची त्यांनी मांडले. त्यांच्या सादरीकरणामुळे या स्पर्धेत त्यांची लढत गोव्याच्या टीमशी झाली. गोव्याच्या टीमने जरी पहिला क्रमांक पटकावला असला तरी देशपातळीवर दुसरा क्रमांक पटकावणारे कॉलेज म्हणजे सातारचे लॉ ठरले. कॉलेजच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरुपाचे बक्षीस खेचून आणल्याने या टीमचे कौतुक होत आहे. ही स्पर्धा दि. 25 व 26 मार्च रोजी पार पडली होती.








