हलगा-बस्तवाड

तालुक्यातील बस्तवाड-हलगा येथे तिथीप्रमाणे शिवजयंती शुक्रवारी उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. शिवजयंती निमित्त दोन्ही गावांमध्ये भगव्या पताका लावण्यात आल्या होत्या. शुक्रवारी सकाळी दोन्ही गावातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीजवळ शिवभक्तांनी विधिवत पूजा केली. त्यानंतर ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणा
दिल्या.
गावात विविध कार्यक्रम उत्साहात

बस्तवाड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन परशराम काकतकर, महेश बांडगी, सुनील मरगानाचे आदींनी केले.
त्यानंतर ध्येयमंत्र व प्रेरणा मंत्र म्हटले. यावेळी राजू मुतगेकर, महेश घंटांनी, प्रमोद मुतगेकर आदी उपस्थित होते. शिवजयंतीनिमित्त गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. हलगा येथे शिवरायांया मूर्तीचे पूजन रोहित येळूरकर, मनोज बाळेकुंद्री, आशिष मोरे, नवनाथ कामांण्णाचे यांच्या हस्ते करण्यात आले. य् ाावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित विविध मान्यवरांची भाषणे झाली. मदन घोरपडे, राहुल हनुमंताचे, प्रतीक हेबाजी, किसन कामाण्णाचे, प्रशांत बिळगोजी, विकी कामाण्णाचे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
राजहंसगड

राजहंसगड येथे तिथीप्रमाणे दि. 10 रोजी शिवजयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. सकाळी हिंदू तिथीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांया मूर्तो पूजन उपस्थित मान्यवरांया हस्ते करण्यात आले. त्यापूर्वी प्रेरणा मंत्र म्हटले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांया मूर्तीला अभिषेक घालण्यात आला. शेवटी ध्येय मंत्राने कार्यक्रमी सांगता झाली. याप्रसंगी शुभम हावळ, कृष्णा लोखंडे, कल्पेश हलगेकर, कृष्णा गडकरी, सोमनाथ गुरव, सुप्रिया पवार, तनुजा हावळ, स्नेहल लोखंडे, मनिषा ााव्हाण, श्रेया नावगेकर आदी शिवभक्त उपस्थित होते.









