शेकडो किलो काजू लांबविला, शेतकऱ्यांना फटका : चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी
बेळगाव : बेकिनकेरे परिसरातील काजूबागांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. घरे, मंदिरे याचबरोबर आता शिवारातील काजू फळबागेलाही लक्ष्य केले आहे. त्यामुळे शेतकरी भयभीत झाले आहेत. मागील पंधरा दिवसात बेकिनकेरे येथील काजू बागांमधून शेकडो किलो काजू लांबविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनादेखील हजारो ऊपयांचा फटका सहन करावा लागत आहे. बेकिनकेरे, अतिवाड परिसरात काजू बागायतक्षेत्र अधिक आहे. दरम्यान काजू फळधारणेला प्रारंभ झाला आहे. तर काजू बागा बहऊन आल्या आहेत. या बागांमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घालून काजू पळविण्याचे प्रकार सुरू ठेवले आहेत. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत हे चोरटे बागेत शिरून शेकडो किलो काजू पळवू लागले आहेत. त्यामुळे या प्रकाराने शेतकरीदेखील हैराण झाले आहेत. पोलीस प्रशासनाने ग्रामीण भागात गस्त वाढवावी, अशी मागणी होत आहे. मागील दोन वर्षात काजू उत्पादकांना फटका बसला होता. त्यामुळे यंदाच्या सिझनवर शेतकऱ्यांच्या अपेक्षा आहेत. मात्र आता चोरट्यांमुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी वाढल्या आहेत. या भागात चोरांची टोळी सक्रिय झाली असून पोलीस खात्याने बंदोबस्त करावा, अशी मागणी होऊ लागली आहे. अलीकडे बागायत क्षेत्र वाढू लागले आहे. दरम्यान काजूला अपेक्षित दर मिळेल, अशी आशा बागायतदारांना आहे. मात्र रात्रीच्यावेळी काजू चोरी होऊ लागल्याने शेतकऱ्यांसमोर प्रŽ पडला आहे. ही चोरांची टोळकी दररोज दोन ते तीन पोती काजू चोरत असल्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे. त्यामुळे या चोरट्यांचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी मागणी बागायत शेतकऱ्यांकडून होत आहे.









