वृत्तसंस्था/ सेंच्युरियन
भारतीय संघातील अष्टपैलू शार्दुल ठाकुरला येथे शनिवारी नेटमध्ये सराव करताना खांद्याला दुखापत झाली आहे. फलंदाजी करताना चेंडू त्याच्या खांद्यावर आदळल्याने त्याला केपटाऊनच्या दुसऱ्या कसोटीला मुकावे लागेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदर कसोटी 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे.
शार्दुल ठाकुरच्या दुखापतीची स्थिती अद्याप समजू शकलेली नाही. लागलीच त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले. शनिवारी भारतीय संघाने नेटमध्ये बराच वेळ सराव केला. राठोडने टाकलेला चेंडू ठाकुरच्या खांद्यावर आदळला होता. ठाकुरला पहिल्या कसोटीतही रबाडाच्या गोलंदाजीवर दोन वेळेला दुखापत झाली होती. उसळता चेंडू त्याच्या कपाळावर आदळल्याने त्याला चांगल्याच वेदना झाल्या होत्या. तसेच आणखी एक वेगवान चेंडू त्याच्या कोपरावर आदळल्याने तो पुन्हा जखमी झाला होता.









