जेद्दाह : सौदी अरेबियातील जेद्दाह या शहराला 2023 साली होणाऱ्या क्लबस्तरीय विश्वचषक फुटबॉल स्पर्धेचे यजमानपद भूषविण्याची संधी फिफाने दिली आहे. गेल्या आठवड्यात फिफाच्या प्रतिनिधी मंडळाने जेद्दाह शहराला भेट दिली होती. त्यानंतर फिफाने या स्पर्धेच्या यजमानपदासाठी जेद्दाह शहराची निवड केली आहे. सदर स्पर्धा 12 ते 22 डिसेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. सौदी अरेबियामध्ये पहिल्यांदाच फिफाची ही मोठी स्पर्धा होत आहे. या क्लबस्तरीय विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी संघांची संख्या मर्यादित होती पण 2025 साली अमेरिकेत प्रथमच होणाऱ्या क्लबस्तरीय विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत सहभागी संघांची संख्या 32 राहणार आहे.
Previous Articleपाकची मागणी अव्हेरली, ‘पीसीबी’ सहभागाबाबत साशंक
Next Article एमएसडीएफ संघाकडे लिटल टायगर चषक
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









