हुसेन जमादार उत्कृष्ट खेळाडू, आर्जव दो•ण्णावर उत्कृष्ट गोलरक्षक
बेळगाव : गोवा येथील सिओलिम फुटबॉल सेंटर जीएफडीसी व गोवा फुटबॉल डेव्हल्पमेंट कौन्सिल आयोजित लिटल टायगर चषक 10 वर्षाखालील फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात बेळगाव एनएसडीएफ संघाने साल्वादोर मुंडो संघाचा टायब्रेकरमध्ये 3-2 असा पराभव करून लिटल टायगर चषक पटकाविला. हुसेन जमादारला उत्कृष्ट खेळाडू तर आर्जव दो•ण्णावर उत्कृष्ट गोलरक्षकाने गौरविण्यात आले. गोवा येथे झालेल्या लिटल टायगर फुटबॉल स्पर्धेत बेळगावच्या एमएसडीएफ संघाने पहिल्या साखळी सामन्यात मंद्रेम संघाचा 1-0 असा पराभव केला. एमएसडीएफतर्फे हुसेन जमादाराने एकमेव गोल केला. दुसऱ्या साखळी सामन्यात एमएसडीएफ संघाने विंटेज 73 संघाचा 2-0 असा पराभव केला. बेळगावतर्फे प्रणव पिल्लाई व हुसेन जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल केला. तिसऱ्या साखळी सामन्यात एमएसडीएफ संघाने जीएफडीसी मेरेम संघाचा 5-0 असा लढतीत पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. बेळगावतर्फे अबुजार तिगडीने 2, हाफिज रेवाडीगार, हसन जमादार व हुसेन जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल केला.
उपांत्य फेरीच्या सामन्यात एमएसडीएफ संघाने जीएफडीसी सिओलिम संघाचा अतितटीच्या लढतीत 2-1 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. बेळगातर्फे हुसेन जमादारने 2 गोल केले. अंतिम सामना एमएसडीएफ संघा व साल्वादोर मुंडो संघा दरम्यान झाला. या सामन्यात निर्धारीत वेळी दोन्ही संघाला गोल करण्यात अपयश आल्याने पंचांनी टायब्रेकर नियमाचा वापर केला. त्यामध्ये एमएफडीएस संघाने 3-2 असा पराभव करून विजेतेपद पटकाविले. बेळगावतर्फे आर्या कंग्राळकर, अबुजार तिगडी, हुसेन जमादार यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सामन्यानंतर सिओलिमचे आमदार डिलायला लोबो, जीएफडीसीचे चेअरमन व भारतीय फुटबॉल संघाचे माजी कर्णधार अर्जुन व पद्म़श्री पुरस्कार विजेते ब्रह्मानंद शंखवाळकर व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विजेत्या एमएसडीएफ संघाला व उपविजेत्या साल्वादोर मुंडो संघाला चषक, प्रमाणपत्र, सर्व खेळाडूना पदके देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू हुसेन जमादार (एमएसडीएफ), उत्कृष्ट गोलरक्षक आर्जव दो•ण्णावर (एमएसडीएफ) यांना चषक देऊन गौरविण्यात आले. विजयी संघात हाफिज रेवडीगार, अबुजार तिगडी, आर्या कंग्राळकर, समर्थ हिरेमठ, स्वयम शिंगनु•ाr, हुजैफा अथणी, हुसेन जमादार, प्रणव पिल्लायी, आर्जव दो•ण्णावर आदी खेळाडूंचा समावेश आहे.









