बेळगाव : हुनशाळ पी. जी. येथील सतीश शुगर्स लिमिटेडच्या 2023-24 सालासाठीच्या गाळप हंगामाला चालना देण्यात आली. शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर रोजी कारखान्याचे व्यवस्थापक मंडळ, अधिकारी व शेतकऱ्यांनी हंगामाला चालना दिली. प्रियाशक्ती स्टील प्रकल्पाचे पूजन संस्थेचे चेअरमन प्रदीपकुमार इंडी यांच्या हस्ते करण्यात आले. हंगामाच्या पहिल्याच दिवशी 850 वाहनातून सुमारे 15 हजार मेट्रिक टन ऊस कारखान्यात दाखल झाला. यावरून शेतकऱ्यांनी कारखान्यावर ठेवलेला विश्वास दिसून येतो. चेअरमन प्रदीपकुमार इंडी म्हणाले, ऊस पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना विनाविलंब बिले दिली जात आहेत. चालू हंगामातही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर वेळेत बिले जमा केली जातील. उत्तम दर्जाचा ऊस पुरवठा करून शेतकऱ्यांनी विकासात हातभार लावावा, असे आवाहनही प्रदीपकुमार इंडी यांनी केले. यावेळी प्रगतशील शेतकरी भीमाप्पा रे•ाr, मल्लिकार्जुन कब्बूर, रवी सन्नक्की, महादेवप्पा पत्तार, सिद्धाप्पा हंजी, यल्लाप्पा सत्तीगेरी, लक्काप्पा अलोशी, शिवाप्पा मुनवळ्ळी, रफिक देसाई, श्रीकांत शिरगावी, यल्लाप्पा मळली, लक्ष्मण पाटील, लक्ष्मण सोगलद, भीमगौडा पाटील आदींसह अनेक शेतकरी उपस्थित होते. संस्थेचे ज्येष्ठ उपाध्यक्ष पी. डी. हिरेमठ, व्ही. एम. तळवार, डी. आर. पवार आदींसह अधिकारीही यावेळी उपस्थित होते.
Previous Articleबेळगाव शुगर्सच्या गळीत हंगामाला सुरुवात
Next Article नंदीहळ्ळीत ऊस फडाला आग, दीड लाखाचे नुकसान
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









