बेळगाव : हुदली येथील बेळगाव शुगर्स प्रा. लि. कारखान्याचा 2023-24 च्या गळीत हंगामाला शुक्रवार दि. 27 ऑक्टोबर रोजी सुरुवात झाली. शेतकरी नेते, कारखान्याचे व्यवस्थापक मंडळ, अधिकाऱ्यांनी हंगामाला थाटात चालना दिली. कारखान्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष एल. आर. कारगी म्हणाले, चालू हंगामात 12 लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याला ऊसपुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना त्वरित बिले देण्यात येतील. कोणत्याही परिस्थितीत विलंब होणार नाही. शेतकऱ्यांनी उत्तम दर्जाचा ऊस पुरवठा करून कारखान्याला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील प्रगतशील शेतकरी मंजुनाथ पाटील, राजू दरगशेट्टी, काशिनाथ इनामदार, हबीब शिलेदार, रियाज बाळेकुंद्री, चंद्रू कुंदरगी, सन्नसंगप्पा कब्बूर, मल्लिकार्जुन ममदापूर, अण्णप्पगौडा बारीगिडद, भागण्णा नरोटी, अडव्याप्पा नाईक, निलकंठ मदवाल, भीमाप्पा मळगली, शिवाप्पा इरनट्टी, सुरेश गवन्नावर, सिद्धण्णा गडकरी आदी उपस्थित होते. कारखान्याचे उपाध्यक्ष एल. आर. कारगी, पी. डी. हिरेमठ, एल. एस. राणा यांच्यासह अधिकारी व कर्मचारी यावेळी हजर होते.
Previous Articleमातोंड ग्रा.पं. सदस्यपदी शिंदे गटाच्या आर्या रेडकर बिनविरोध
Next Article सतीश शुगर्सच्या गळीत हंगामाला प्रारंभ
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









