तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या उदगाराने महसुल विभाग झाला भावूक
प्रतिनिधी/ सातारा
सिंधुदुर्गहून गडचिरोली आणि तेथून साताऱयाला आलो. सातारा म्हंटलं की, हिस्ट्रीशी नाळ जोडली गेलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला हा सातारा आहे. लिंबखिंडीतून सातारा प्रथम पहिला होता तेव्हा एक वेगळं नातं जोडलं गेलं होते. त्या साताऱयाने मला भरभरुन प्रेम आणि आपुलकी गेल्या अडीच वर्षात दिली. सातारचे लोक सर्वात चांगले आहेत, असे मत मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी काढले. दरम्यान, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनीही कोणत्याही अधिकाऱयास कसलीही अडचण आली की लगेच मला भेटायचे. कसलीही शंका, कुशंका न बाळगता असे आवाहन त्यांनी केले.
महसूल दिनाच्या निमित्ताने जिल्हा बँकेच्या सभागृहात मावळते जिल्हाधिकारी शेखर सिंह व जिल्हाधिकारी रुपेश जयवंशी यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, सौ. ईशा सिंह, सह पोलीस अधीक्षक ऑचल दलाल, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र सरकाळे, अनिल देसाई यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शेखर सिंह म्हणाले, माझा संपूर्ण कार्यकाळ अतिशय छान गेला. प्रत्येकाने मला चांगले सहकार्य केले. माझी साताऱयाला जेव्हा बदली झाली होती तेव्हा प्रथमच साताऱयाचा किल्ले अजिंक्यताऱयाचा डोंगर लिंब खिंडीतून पाहिला अन् काम करण्याची प्रेरणा मिळाली. साताऱयाला स्व. यशवंतराव चव्हाण, कर्मवीर भाऊराव पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील यांचा वारसा आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील ब्रिटीशकालिन इमारत पाहिली. तेथेच केबीन असावे असे वाटले. नव्या इमारतीत केबीन असल्याचे समजले. ब्रिटीश काळातील कलेक्टरांचा काळ वेगळा होता. स्वातंत्र्यानंतर वेगळा होता आणि आताचा वेगळा आहे. साताऱयात आल्यापासून हेरिटेज वास्तू जपण्याचा संकल्प केला. सातारचे लोक सर्वात चांगले आहेत. आतापर्यंत त्यांनी माझ्यावर भरभरुन प्रेम केले. माझी बदली झाल्यापासून मागच्या आठवडय़ापासून ते पाहतोय. काही लोक क्रिटीकल थिंकींग ठेवण्याचे धाडस करतात. मी व्हॉट्सऍपवर जास्त ऍक्टीव्ह असायचो. माझ्याकडे तक्रार आली की लगेच संबंधित विभागाला सूचना करायचो. जिह्यातील लोकांनी माझ्यावर प्रेम केले ते मी विसरणार नाही. कोरोना काळातील परिस्थिती खूप भयानक होती. रेल्वे बंद होती, एसटी बंद होती. आपल्याला आयुर्वेद तारेल असे वाटले होते. प्रशासनापुढे प्रश्न होता. 144 च्या ऑर्डरचा जिह्यात पूर आला होता. जिह्यात ज्यावेळी गडचिरोलीवरुन आलो. त्यावेळी मला पहिली बाब जाणवली ती म्हणजे गडचिरोलीला अनेक पोस्ट रिकाम्या असतात. तसे साताऱयातील जिल्हा रुग्णालयात एमडी पद रिक्त होते. 6 आयसीयु बेड होते. तेव्हा आलेले जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनाच नीटसी माहिती नव्हती. आमचे संजय आसवले असतील, पोलीस अधीक्षक अजय असतील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी संतोष पाटील असतील यांनी खूप मोलाचे सहकार्य केले. त्यावेळी सगळय़ांनी चांगले काम केले त्या सर्वांना सलाम आहे.
सर्वांची साथ मिळाली… सॅल्युट
जंबो कोव्हीड उभारताना बांधकाम विभाग, क्रिडाई यांचा मला अभिमान वाटतो. ऑक्सिजनचा टँकरही बंदोबस्तात आणला होता. एनएचआयच्या विरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत होत्या. त्यावेळी पुणे ते सातारा हायवेला पडलेले खड्डे, टोलनाका नको अशी होणारी मागणी हे सर्व लोकांच्या भावना होत्या. महाबळेश्वरच्या रोप वेचा प्रस्ताव पाठवण्यात आला. उपजिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी चांगले काम केले. निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे हे 100 टक्के परफेक्ट आरडीसी ठरले आहेत. जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे हिने कोरोना काळात चांगले काम केले आहे. तहसीलदार म्हणून विवेक खूप इंटालिजींट आहे. ग्रामपंचायत विभागाचे तनपूरे यांच्यासह सर्वांनीच काम केले. प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले यांनी चांगले काम केले आहे. मिरज पुणे रेल्वेचे काम सुरु आहे. हे काम अधिक चांगल्या रितीने करावे लागणार आहे. मी अनेक अधिकाऱयांना शिक्षा ही दिलेली आहे. सातारा जिह्यातील सर्वच नगरपालिकेचे सीओ चांगले आहेत. कराड,सातारा आणि पाचगणीला माझी वसुधंरा अभियानात बक्षीस मिळाले हे माहीती आहे. तहसीलदारांनीही चांगले काम केले आहे. डीपीओ यांच्यापासून कोतवालांनीही चांगले काम केले आहे, असे त्यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, मी देवाचे प्रथम धन्यवाद देतो. महाराष्ट्राची नव्हे. देशाची नव्हे तर स्वराज्याच्या राजधानीत मला काम करण्याची संधी मिळाली आहे. मी जॉईन झाल्यानंतर शेखर सिंह यांना भेटलो. त्यांना विचारले. तुमचे अपुर्ण राहिलेले आवडते काम सांगा. मी ते पुढे सुरु ठेवतो. आमच्या सर्व्हिसमध्ये दोन ते तीन वर्ष असतात. त्यानंतर बदली होते. मी जेथे जातो तेथे आधी जे काम आहे त्याबाबत विचारतो. शेखर सिंह यांच्या भाषणातील टीप्पणी मी काढली आहेत. एचओडीनी स्वतःहून कामासाठी काही अडचणी आल्यास मला भेटावे. कसलेही बंधन असणार नाही. मोकळे वातावरण असणार आहे. माझे आणि जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यामध्ये एक साम्य आहे. मीही चार वर्ष गडचिरोलीला काम केले आहे. मी प्रकल्प संचालक असताना शेखर सिंह यांच्याशी संबंध आला. स्वच्छ भारत मिशनमध्ये त्यांनी सिंधुदूर्गमध्ये चांगले काम केले. टुरिझमचे काम त्यांनी केले. येथेही टुरिझमचे त्यांनी केलेले काम पुढे पूर्णत्वाला नेले जाईल. तसेच दिव्यांगाचा विषयी मला खूप आत्मियता आहे. सहा महिने मी काम केले आहे. त्यांच्या वेदना व्यथा मला आहेत. दिव्यांगाचा 5 टक्के निधी कसा खर्च करता येईल या अनुषगाने मी चर्चा करुन सूचना देणार आहे. माझा दिव्यांग कल्याणाचा आवडीचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
उपजिल्हाधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा पुरवठा अधिकारी स्नेहा किसवे देवकाते यांच्यासह मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली. सूत्रसंचालन जिल्हा बँकेचे सुजित शेख यांनी केले.








